बॉलिवूडचा किंग शाहरुख खानला ‘हे’ काम करण्यासाठी लागतो खूप उशीर!

By ऑनलाइन लोकमत | Published: November 4, 2017 03:44 PM2017-11-04T15:44:13+5:302017-11-04T21:14:13+5:30

बॉलिवूडचा किंग शाहरुख खानचे म्हणणे आहे की, त्याला लोकांना ‘नाही’ म्हणण्यास खूप अवघड वाटते. विशेषत: चित्रपटांच्या आॅफर्स देणाºया मित्रांना ...

Bollywood King Shah Rukh Khan starts to do this work too late! | बॉलिवूडचा किंग शाहरुख खानला ‘हे’ काम करण्यासाठी लागतो खूप उशीर!

बॉलिवूडचा किंग शाहरुख खानला ‘हे’ काम करण्यासाठी लागतो खूप उशीर!

googlenewsNext
लिवूडचा किंग शाहरुख खानचे म्हणणे आहे की, त्याला लोकांना ‘नाही’ म्हणण्यास खूप अवघड वाटते. विशेषत: चित्रपटांच्या आॅफर्स देणाºया मित्रांना नकार देताना मला खूपच त्रास होतो. जेव्हा शाहरुखला विचारण्यात आले की, चित्रपटांच्या पटकथाना नकार देणे तुला कितपत अवघड होते? तेव्हा त्याने म्हटले की, ‘मला नाही म्हणण्यास खूप वेळ लागतो. कारण मी लोकांप्रती खूपच संवेदनशील आहे. त्यामुळे मला यासाठी खूपच वेळ लागतो. बºयाचदा तर मी कित्येक महिने माझे मत कळवित नाही, असेही शाहरुखने सांगितले. 

शाहरुखने म्हटले की, ‘जेव्हा मी चित्रपटांना नकार देतो, तेव्हा लोक विचार करायला लागतात की, मी नकार का दिला? त्याचबरोबर त्यांना असे वाटते की, माझ्या नकारामुळे आपल्या कथेत काही उणिवा आहेत काय? मात्र प्रामाणिकपणे सांगायचे झाल्यास असे काहीही नसते. हे एखाद्या नात्याप्रमाणे आहे. तुम्ही तुमची पुढील यात्रा समाप्त करण्यासाठी अशाप्रकारच्या शब्दांचा प्रयोग करता. कधी-कधी तर इच्छा नसतानाही अशाप्रकारच्या शब्दांचा प्रयोग करावा लागतो, असेही शाहरुखने म्हटले. 



शाहरुखने गेल्या गुरुवारीच त्याचा ५२ वा वाढदिवस साजरा केला. अलिबाग येथील त्याच्या फार्म हाउसमध्ये मोठ्या उत्साहात शाहरुखचा वाढदिवस सेलिब्रेट केला गेला. यावेळी त्याच्या परिवारातील सदस्यांसह बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रेटी उपस्थित होते. त्याचबरोबर शाहरुखच्या मुंबईस्थित ‘मन्नत’ या बंगल्याबाहेर त्याच्या चाहत्यांनी प्रचंड गर्दी केली होती. शाहरुखने ट्विटच्या माध्यमातून त्याच्या चाहत्यांचे आभार मानले. 

Web Title: Bollywood King Shah Rukh Khan starts to do this work too late!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.