ये प्यार नहीं तो और क्या!! रेखासाठी अमिताभ बच्चन यांनी केली होती मारामारी
By ऑनलाइन लोकमत | Published: January 17, 2024 07:12 PM2024-01-17T19:12:28+5:302024-01-17T19:13:32+5:30
Bollywood news: बिग बींनी रेखासाठी एका व्यक्तीला सगळ्यांसमोर फिल्मी स्टाइलमध्ये मारलं होतं.
बॉलिवूडमध्ये कायमच कलाकारांच्या अफेअर, ब्रेकअप, लग्न, घटस्फोट यांच्या चर्चा रंगत असतात. परंतु, या सगळ्यात अशी एक जोडी आहे त्यांच्या अफेअरच्या चर्चा गेल्या कित्येक दशकांपासून चर्चिल्या जात आहेत. ही जोडी म्हणजे अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) आणि रेखा (Rekha). या दोघांच्या नात्याविषयी दररोज असंख्य चर्चा रंगत असतात. यामध्येच एक जुना किस्सा चर्चिला जात आहे. एकेकाळी रेखासाठी चक्क बिग बींनी मारामारी केली होती.
७०-८० च्या दशकात रेखा आणि अमिताभ बच्चन यांच्या अफेअरच्या चर्चांनी मोठा जोर धरला होता. इतकंच नाही तर जया बच्चन यांच्यामुळे रेखा आणि अमिताभ यांचा ब्रेकअप झाला असंही म्हटलं जातं. त्यामुळे या जोडीचे अनेक किस्से आहेत. असाच किस्सा १९७६ मध्ये घडला होता. 'दो अंजाने' सिनेमाच्या सेटवर ही जोडी एकमेकांच्या प्रेमात पडली. मात्र, त्यावेळी त्यांनी त्यांचं नात सगळ्यांपासून लपवलं होतं. परंतु, अमिताभ यांच्या रागामुळे हे नातं सगळ्यांसमोर उघड झालं.
रेखासाठी अमिताभने केली फिल्मी स्टाइलमध्ये मारामारी
'गंगा की सौगंध' या सिनेमात अमिताभ बच्चन, रेखा आणि जया बच्चन या तिघांनी एकत्र स्क्रिन शेअर केली होती. या सिनेमाचं जयपूरमध्ये शुटिंग सुरु होतं. जयपूरमध्ये रेखा आणि अमिताभ आल्याचं कळल्यानंतर तेथील लोकांनी या कलाकारांना बघण्यासाठी मोठी गर्दी केली. याच गर्दीत एक व्यक्ती रेखाकडे अत्यंत वाईट नजरेने पाहात होता. या व्यक्तीला सिनेमाच्या क्रू मेंबरने समजवायचा प्रयत्न केला. परंतु, ऐकायला तयार नव्हता. तो रेखाला उलटसुलट बोलू लागला. त्याचं हे वागणं पाहून बिग बी प्रचंड संतापले आणि त्यांनी थेट या व्यक्तीला मारायला सुरुवात केली.
दरम्यान, बिग बींनी सगळ्यांसमोर या व्यक्तीला मारहाण केल्यामुळे त्यांचं आणि रेखाचं नात जगजाहीर झालं. इतकंच नाही तर त्याचा परिणाम अमिताभ यांच्या वैवाहिक जीवनावरही झाला. परंतु, या घटनेनंतर बिग बी आणि जया बच्चन यांच्यात असं काही बोलणं झालं ज्यामुळे अमिताभ यांनी रेखापासून फारकत घेतली.