हलाखीत दिवस काढले, झोपडीत राहिला पण नंतर मेहनतीच्या जोरावर 'कॉमेडीचा बादशाह' झाला! कोण आहे हा अभिनेता?
By ऑनलाइन लोकमत | Published: October 21, 2024 01:10 PM2024-10-21T13:10:34+5:302024-10-21T13:11:52+5:30
बॉलिवूडमधील या अभिनेत्याने मोलमजुरी करुन गरिबीत दिवस काढले नंतर बॉलिवूडमध्ये स्वतःचं नाव कमाववं
बॉलिवूडमध्ये अनेक कलाकार स्टारपदावर पोहोचले आहेत. परंतु लोकप्रियता मिळवण्याआधी या कलाकारांचा संघर्षाचा काळ खूप कठीण होता. बॉलिवूड कलाकारांच्या सुरुवातीच्या स्ट्रगलची आपण कल्पना करु शकत नाही. सध्या बॉलिवूडमध्ये असणाऱ्या अनेक कलाकारांना सुरुवातीला अत्यंत वाईट प्रसंगांना सामोरं जावं लागलं आहे. असाच बॉलिवूडमधील एक अभिनेता सुरुवातीला झोपडीत राहिला, गरीबीचे दिवस बघितले पण नंतर हा अभिनेता स्टारपदावर पोहोचला. कोण होता हा अभिनेता. या अभिनेत्याचं नाव कादर खान.
कादर खान यांंचं सुरुवातीचं हलाखीचं आयुष्य
कादर खान यांचा जन्म २२ ऑक्टोबर १९३७ रोजी झाला. अफगाणिस्तानामधीव काबुलमध्ये त्यांचा जन्म झाला. परंतु नंतर आई-वडिलांसोबत ते मुंबई आले. पुढे त्यांनी झोपडीत वास्तव्य करुन हलाखीचं जीवन अनुभवलं. मीडिया रिपोर्टनुसार कादर खानच्या आई-वडिलांचा घटस्फोट झाला. पुढे त्यांच्या आईचं जबरदस्ती एका दुसऱ्या व्यक्तीशी लग्न लावण्यात आलं. त्यामुळे कादर खान यांचा सावत्र वडील अत्यंत आक्रमक होता. त्यांचे सावत्र वडील त्यांना भीक मागायला जबरदस्ती करायचे.
Another legend, a Pashtun born in Balochistan, half Afghani, who later became a Civil Engineering Professor in a Bombay Engnn College. RIP Kader Khan pic.twitter.com/zd8iuOQpHm
— Gabbar (@GabbbarSingh) July 11, 2020
कादर खान यांनी एका मुलाखतीत सांगितलं की, "आठवड्यातून तीन दिवस आमचं कुटुंब उपाशीपोटी झोपायचं. कमी वयात मी शाळा सोडली होती. पुढे आईच्या सांगण्यावरुन मी मोलमजुरी सोडली आणि शिक्षण पूर्ण करुन इंजिनीयर झालो." 'जर तू मजुरी केलीस तर प्रतीदिन फक्त ३ रुपये कमावशील पण जर शिकलास तर या गरीबीतून बाहेर येशील', असं त्यांची आई त्यांना म्हणाल्या होत्या. पुढे कादर खान शिक्षण करुन फिल्म इंडस्ट्रीत आले. लेखन, अभिनय करुन 'विनोदाचे बादशाह' म्हणून त्यांनी ओळख मिळवली.