'वारंवार मनाला समजावण्याचा प्रयत्न केला पण..'; 'त्याच्या' आठवणीत मलायका भावुक

By ऑनलाइन लोकमत | Published: September 1, 2021 01:13 PM2021-09-01T13:13:24+5:302021-09-01T14:34:09+5:30

Malaika aroras in pain : 'आता तो माझ्या आसपास नसेल हे मी वारंवार मनाला समजावण्याचा प्रयत्न करत आहे', असं ती या मुलाखतीत म्हणाली.

bollywood malaika aroras in pain told how life is without her son arhaan khan | 'वारंवार मनाला समजावण्याचा प्रयत्न केला पण..'; 'त्याच्या' आठवणीत मलायका भावुक

'वारंवार मनाला समजावण्याचा प्रयत्न केला पण..'; 'त्याच्या' आठवणीत मलायका भावुक

googlenewsNext
ठळक मुद्देमलायका कायमच तिच्या फिटनेसमुळे चर्चेत असते. मात्र, गेल्या काही दिवसांपासून मलायका तिच्या पर्सनल लाइफमुळे चर्चेत येत आहे.

वय हा केवळ आकडा असतो हे अभिनेत्री मलायका अरोराकडे पाहिलं की लक्षात येतं. त्यामुळे मलायका कायमच तिच्या फिटनेसमुळे चर्चेत असते. मात्र, गेल्या काही दिवसांपासून मलायका तिच्या पर्सनल लाइफमुळे चर्चेत येत आहे. अलिकडेच मलायकाचा मुलगा अरहान शिक्षणासाठी परदेशात गेला आहे. त्यामुळे मलायका चांगलीच एकाकी पडली असून बऱ्याचदा तिने सोशल मीडियाच्या माध्यमातून तिच्या भावना व्यक्त केल्या आहेत. काही दिवसांपूर्वी अरहानच्या आठवणीत मलायकाने एक पोस्ट शेअर केली होती. त्यानंतर आता एका मुलाखतीत तिने तिचं दु:ख व्यक्त केला आहे. 'आता तो माझ्या आसपास नसेल हे मी वारंवार मनाला समजावण्याचा प्रयत्न करत आहे', असं ती या मुलाखतीत म्हणाली.

अरहान पहिल्यांदाच मलायकाला सोडून इतक्या लांब गेला आहे. त्यामुळे त्याचा विरह मलायकाला सहन होत नसल्याचं दिसून येतं आहे.
"हा काळ माझ्यासाठी खरंच फार कठीण आहे. यापुढे तो माझ्या आसपास नसेल हेच मी वारंवार माझ्या मनाला समजावण्याचा प्रयत्न करत आहे. पण, मला या सगळ्याची इतक्यात सवय होईल असं मला वाटत नाही", असं मलायका म्हणाली.

मलायकालाही जाणवतोय Empty nest syndrome, मुलं दूर शिकायला गेली की आईला घर खायला उठतं, कारण..

दरम्यान, काही दिवसांपूर्वीच मलायकाने अरहान आणि तिच्या पाळीव श्वानासोबतचा एक फोटो शेअर केला होता. या फोटोचं कॅप्शन देताना तिने तिच्या भावना व्यक्त केल्या होत्या. आम्ही दोघंही आता एका नव्या आणि अपरिचित प्रवासावर निघालो आहोत. हा प्रवास भीती, उत्साह, नवे अनुभव यांनी परिपूर्ण असणार आहे. मला फक्त इतकंच ठावूक आहे की मला अरहानचा फार अभिमान आहे. आताचा काळ तुझ्यासाठी पंख पसरण्यासाठी, उडण्यासाठी आणि आपली स्वप्न पूर्ण करण्यासाठीच आहे. तुला खूप मिस करतीये, अशा आशयाचं कॅप्शन मलायकाने या फोटोला दिलं होतं.
 

Web Title: bollywood malaika aroras in pain told how life is without her son arhaan khan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.