सलमान अन् आमिर ३० वर्षानंतर पुन्हा एकत्र काम करणार? व्हायरल पोस्टमुळे चर्चेला उधाण

By ऑनलाइन लोकमत | Published: August 23, 2024 03:44 PM2024-08-23T15:44:54+5:302024-08-23T15:57:06+5:30

'अंदाज अपना अपना' ही सिनेमा रिलीज होऊन जवळपास ३० वर्षांहून अधिक काळ लोटला आहे.

bollywood movie andaz apna apna salman khan and aamir khan reunion after 30 years hint by aamir khan production viral tweet | सलमान अन् आमिर ३० वर्षानंतर पुन्हा एकत्र काम करणार? व्हायरल पोस्टमुळे चर्चेला उधाण

सलमान अन् आमिर ३० वर्षानंतर पुन्हा एकत्र काम करणार? व्हायरल पोस्टमुळे चर्चेला उधाण

Salman Khan Aamir khan Andaz Apna Apna Sequal : 'अंदाज अपना अपना' ही सिनेमा रिलीज होऊन जवळपास ३० वर्षांहून अधिक काळ लोटला आहे. १९९४ मध्ये प्रदर्शित झालेल्या बॉलिवूड अभिनेता सलमान खान आणि आमिर खान या चित्रपटात एकत्र झळकले होते. ९० च्या दशकातील या चित्रपटामधील सलमान-आमिरची जुगलबंदी आजही प्रेक्षकांना आठवते. तसेच चाहत्यांमध्ये या चित्रपटाची क्रेझ आजही पाहायला मिळते. या चित्रपटातील गाणी देखील त्याकाळी प्रचंड गाजली होती. राजकुमार संतोषी यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं होतं. 

'अंदाज अपना अपना' चित्रपटात सलमान खान, आमिर खान, रवीना टंडन, करिष्मा कपूर  परेश रावल यांसारखी तगडी स्टारकास्ट पाहायला मिळाली. या चित्रपटानंतर सलमान-आमिर यांनी पुन्हा कधीच एकत्र काम केलं नाही. 'अंदाज अपना अपना'चा दुसरा भाग कधी येणार याची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत. 

दरम्यान, सोशल मीडियावर यासंदर्भात एक ट्वीट तुफान व्हायरल होत आहे. आमिर खान प्रोडक्शन हाऊसच्या एक्स अकाउंटवरून ट्वीट शेअर करण्यात आलं आहे. त्यामुळे नेटकऱ्यांमध्ये चर्चा रंगली आहे. आमिर खान प्रोडक्शनद्वारे सलमान खानचं २०१४ मधील एक ट्वीट शेअर करण्यात आलं आहे. त्यामध्ये असं लिहलंय, आम्ही याबाबत खूप विचार केला आहे".  यामागचं कारणही तितकंच खास आहे.

झालं असं की, २०१० मध्ये आमिर खान प्रोडक्शनमध्ये बनलेला चित्रपट 'पीपली लाईव्ह' पाहून सलमान खानने त्यासंदर्भात ट्विट केलं होतं.  "या चित्रपटानंतर मी आमिरला मला हातच लावू दिला नाही. जर त्याने मला स्पर्श केल्याने माझं शरीर सोन्याचं झालं तर?"आता या ट्विटवर आमिर खान प्रोडक्शने जवळपास  १४ वर्षानंतर प्रतिक्रिया दिली आहे.  

आता इतकी वर्षे उलटूनही आमिर खान प्रोडक्शनने हे ट्वीट पुन्हा शेअर का केलं? असा प्रश्न प्रेक्षकांना पडला आहे. त्यामुळे नेटकरी अंदाजअपना अपना सीक्वेल येणार का असा अंदाज लावत आहेत.

Web Title: bollywood movie andaz apna apna salman khan and aamir khan reunion after 30 years hint by aamir khan production viral tweet

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.