खुशखबर! 23 सप्टेंबरला थिएटर्समध्ये फक्त 75 रुपयांना पाहता येणार चित्रपट, पण...

By ऑनलाइन लोकमत | Published: September 20, 2022 04:02 PM2022-09-20T16:02:22+5:302022-09-20T16:04:18+5:30

National Cinema Day on 23rd September :  पीव्हीआर यावर्षी आपला 25 वा वर्धापन दिन साजरा करत आहे.

bollywood national cinema day watch film in just rs 75 these city not in list | खुशखबर! 23 सप्टेंबरला थिएटर्समध्ये फक्त 75 रुपयांना पाहता येणार चित्रपट, पण...

खुशखबर! 23 सप्टेंबरला थिएटर्समध्ये फक्त 75 रुपयांना पाहता येणार चित्रपट, पण...

googlenewsNext

नवी दिल्ली : चित्रपट प्रेमींसाठी एक आनंदाची बातमी आहे. दरम्यान, ही बातमी मल्टिप्लेक्स असोसिएशन ऑफ इंडियाने या महिन्याच्या सुरुवातीला जाहीर केली होती. यामध्ये 16 सप्टेंबर हा राष्ट्रीय चित्रपट दिन असेल. देशभरातील 4 हजार मल्टिप्लेक्समध्ये फक्त 75 रुपयांना तिकीट विकले जाणार असल्याचे जाहीर केले होते. मात्र, 16 सप्टेंबरला तसे होऊ शकले नाही. असोसिएशनने नंतर पुन्हा जाहीर केले की, राष्ट्रीय चित्रपट दिन आता 23 सप्टेंबर रोजी देशभरात साजरा केला जाणार आहे.

अनेक सिनेमा हॉलमध्ये (Cinema Hall) या आधारे बुकिंगही सुरू झाले आहे. पीव्हीआर यावर्षी आपला 25 वा वर्धापन दिन साजरा करत आहे. यानिमित्ताने ही ऑफर देशभरातील 4 हजार मल्टिप्लेक्समध्ये या शुक्रवारी म्हणजेच 23 सप्टेंबरपासून पीव्हीआर सिनेमागृहात लागू करण्यात आली आहे. पण, ही ऑफर प्रत्येक थिएटरमधील प्रेक्षकांसाठी नाही आहे.

या शहरातील प्रेक्षकांना मिळणार नाही लाभ
पीव्हीआरने (PVR 25 Anniversary) आपल्या घोषणेमध्ये म्हटले आहे की, ही ऑफर हैदराबाद, कोचीसह अनेक दक्षिण भारतीय शहरांमधील पीव्हीआरमध्ये उपलब्ध असणार नाही. एकीकडे पीव्हीआरच्या या घोषणेने देशभरातील लोक खूश आहेत. तर हैदराबाद आणि कोचीसह अनेक दक्षिण भारतीय शहरांमध्ये राहणारे लोक निराश होतील, कारण 'डोंगलुन्नारू जगरथा', 'कृष्ण वृंदा विहारी' आणि 'अल्लुरी' या शुक्रवारी तेलुगू भाषेत प्रदर्शित होणार आहेत.

... तर 'ब्रह्मास्त्र'च्या कलेक्शनला बसला असता फटका
दरम्यान, राष्ट्रीय चित्रपट दिनाची तारीख पुढे ढकलण्याच्या मुद्द्यावरून एक अफवा पसरली की 'ब्रह्मास्त्र'च्या निर्मात्यांनी तिकिटांची विक्री वाढवण्यासाठी राष्ट्रीय चित्रपट दिनाची तारीख वाढवली. कारण 'ब्रह्मास्त्र' हा चित्रपट 12 सप्टेंबरला बॉक्स ऑफिसवर प्रदर्शित झाला होता. जर राष्ट्रीय चित्रपट दिन 16 सप्टेंबरला साजरा झाला असता तर 'ब्रह्मास्त्र'च्या कलेक्शनला फटका बसला असता.

Web Title: bollywood national cinema day watch film in just rs 75 these city not in list

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :cinemaसिनेमा