Amitabh Bachchan News: 26 जुलै 1982 चा 'तो' अपघात...कोमात गेले होते महानयक Amitabh Bachchan ; काय झालं होतं?

By ऑनलाइन लोकमत | Published: March 6, 2023 02:29 PM2023-03-06T14:29:12+5:302023-03-06T14:43:22+5:30

बॉलिवुडचे महानयक अमिताभ बच्चन 'प्रोजेक्ट के' चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान जखमी झाले आहेत.

bollywood news, amitabh bachchan went into coma after being punched, kuli film story | Amitabh Bachchan News: 26 जुलै 1982 चा 'तो' अपघात...कोमात गेले होते महानयक Amitabh Bachchan ; काय झालं होतं?

Amitabh Bachchan News: 26 जुलै 1982 चा 'तो' अपघात...कोमात गेले होते महानयक Amitabh Bachchan ; काय झालं होतं?

googlenewsNext


मुंबई : बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन गेल्या पाच अनेक दशकांपासून आपले मनोरंजन करत आहेत. त्यांच्या काळातले अनेक अभिनेते चित्रपटापासून दूर आहेत, मात्र अमिताभ आजही तरुणांप्रमाणे काम करतात. अमिताभ बच्चन सोशल मीडियावरही खूप सक्रिय असतात. यावरुन त्यांनी एक मोठी माहिती दिली आहे. 'प्रोजेक्ट के' चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान अमिताभ बच्चन जखमी झाले आहेत. यानंतर त्यांना तात्काळ रुग्णालयात नेण्यात आले. त्यांना डॉक्टरांनी विश्रांतीचा सल्ला दिला आहे.

यापूर्वी मोठा अपघात झाला
विशेष म्हणजे, 40 वर्षांपूर्वी अमिताभ यांच्यासोबत शूटिंगदरम्यान मोठा अपघात घडला होता. त्या अपघातानंतर अमिताभ यांना आयसीयूत भरती करण्यात आले होते आणि ते यातून थोडक्यात बचावले होते. 'कुली' चित्रपटाच्या सेटवर त्यांच्यासोबत घडलेली ती मोठी घटना चाहत्यांच्याही मनात घर करुन गेली होती. 

'कुली'च्या सेटवर भीषण अपघात
ही घटना 26 जुलै 1982 ची आहे. अमिताभ बच्चन कुली या चित्रपटाचे शूटिंग करत होते. शूटिंग बंगळुरुमध्ये सुरू होते. अमिताभ यांना एक अॅक्शन सीन शूट करायचा होता. या सीनमध्ये त्यांचे आणि पुनीत इसार यांची फाईट होती. पुनीत इसारला अमिताभच्या तोंडावर ठोसा मारुन टेबलावर फेकून द्यायचे होते. सीन शूट झाला, सगळ्यांनी टाळ्या वाजवल्या, पण थोड्या वेळाने अमिताभ यांच्या पोटात दुखणे सुरू झाले.  सुरुवातीला त्यांनी ही बाब गांभीर्याने घेतली नाही, पण दुसऱ्या दिवशीही वेदना कमी होत नव्हत्या. 

यानंतर डॉक्टरांनी बिग बींचा एक्स-रे काढला तर त्यात पोटात गॅस दिसला. हा गॅस फाटलेल्या आतड्यातून येत होता. यानंतर त्यांच्यावर ताबडतोब ऑपरेशन करण्यात आले, पण संसर्ग शरीरभर पसरला होता. तीव्र ताप-उलट्या थांबण्याचे नाव घेत नव्हते, यानंतर ते कोमात गेले. ऑपरेशनच्या दुसऱ्या दिवशी त्यांना न्यूमोनियाही झाला. तब्येतीत सुधारणा न झाल्याने सर्वजण घाबरले होते. त्यानंतर अमिताभ यांना मुंबईला रेफर करण्यात आले. मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात आठ तास ऑपरेशन चालले. ही बातमी सर्वत्र पसरली होती. प्रत्येकाने आपल्या लाडक्या अभिनेत्यासाठी प्रार्थना केली आणि अखेर ते बरे झाले.

 

Web Title: bollywood news, amitabh bachchan went into coma after being punched, kuli film story

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.