आंधळा दळतो, कुत्रा पीठ खातो...! एअरपोर्ट स्टाफवर बरसल्या नीना गुप्ता; पहा व्हिडीओ
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 10, 2021 13:26 IST2021-10-10T13:24:35+5:302021-10-10T13:26:01+5:30
Neena Gupta video : सध्या नीनांचा एक व्हिडीओ चर्चेत आहे. एअरपोर्ट स्टाफमध्ये आपआपसांत सामंजस्य नसल्यामुळे आपल्याला कसा नाहक त्रास सहन करावा लागला, हे त्यांनी या व्हिडीओत सांगितलं आहे.

आंधळा दळतो, कुत्रा पीठ खातो...! एअरपोर्ट स्टाफवर बरसल्या नीना गुप्ता; पहा व्हिडीओ
बॉलिवूडच्या ज्येष्ठ अभिनेत्री नीना गुप्ता ( Neena Gupta) त्यांच्या दमदार अभिनयासाठी ओळखल्या जातात. तेवढ्यात त्यांच्या परखड व बिनधास्त स्वभावासाठीही ओळखल्या जातात. नीना यांचे सोशल मीडिया अकाऊंट पाहिल्यास तुम्हालाही याचा अंदाज येईल. सध्या याच नीनांचा एक व्हिडीओ चर्चेत आहे. होय, इन्स्टाग्रामवर त्यांनी एक व्हिडीओ शेअर केला. यात त्या एअरपोर्ट स्टाफवर भडकलेल्या दिसत आहेत.
एअरपोर्ट स्टाफमध्ये आपआपसांत सामंजस्य नसल्यामुळे आपल्याला कसा नाहक त्रास सहन करावा लागला, हे त्यांनी या व्हिडीओत सांगितलं आहे. ‘सच कहूं तो’ या कॅप्शनसह नीना यांनी हा व्हिडीओ शेअर केला.
व्हिडीओत त्या म्हणतात, ‘आज एअरपोर्टवर मला खूपच वाईट अनुभव आला. तुमच्याकडे ऑनलाईन बोर्डिंग पास असेल तरीही त्याची हार्ड कॉपी स्वत:जवळ ठेवा. माझ्याजवळ हार्ड कॉपी नव्हती. मी रांगेत उभी होते. त्यांनी मला माझा बोर्डिंग पास विचारला. यावर, अरे मी विसरले, असं मी त्यांना म्हणाले. मी माझा बोर्डिंग पास आणायला गेले तेव्हा तुमच्या फोनमध्ये जो बोर्डिंग पास आहे, तो चालेल, असं त्यांनी मला सांगितलं. मी पुन्हा रांगेत उभे झाले. त्यांनी मला पुन्हा बोर्डिंग पासची हार्ड कॉपी मागितली. यावर मी चिडले. मला चिडायचे नव्हते. पण मी चिडले. तुम्ही आपआपसांत ठरवायला हवं,असं मी त्यांना म्हणाले.’
नीनांच्या या पोस्टवर नेटक-यांनीही वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. काहींनी त्यांना पाठींबा दिला आहे तर काहींनी विमानतळावर रस्ता अडवून अशाप्रकारे व्हिडीओ बनवल्याबद्दल त्यांना ट्रोल करण्याचा प्रयत्नही केला आहे.
मुलीला म्हणाल्या, गप्प बस...
नीनाच्या या व्हिडीओवर त्यांची मुलगी मसाबानेही कमेंट केली आहे. तू व्हिडीओ बनवत असताना तुझ्या मागे ब्ल्यू बॅग असलेली व्यक्ति बोर्डिंग गेटमधून निघण्यासाठी बघ कसा संघर्ष करत होता..., अशी कमेंट मसाबाने केली आहे. यावर नीना यांनी उत्तरही दिलं आहे. गप्प बस, तिथे खूप सारी जागा होती, असं त्यांनी म्हटलं आहे.