The Legend Of Maula Jatt: 200 कोटी कमवणारा पाकिस्तानी चित्रपट भारतात रिलीज होणार; रणवीरच्या 'सर्कस'शी टक्कर?
By ऑनलाइन लोकमत | Published: December 4, 2022 04:14 PM2022-12-04T16:14:48+5:302022-12-04T16:15:15+5:30
The Legend Of Maula Jatt: फवाद खान, माहिरा खान आणि हमजा अली अब्बासी यांसारख्या पाकिस्तानातील बड्या स्टार्सचा अभिनय पाहायला मिळणार आहे.
The Legend Of Maula Jatt India Release:फवाद खान, माहिरा खान आणि हमजा अली अब्बासी यांसारख्या पाकिस्तानातील बड्या स्टार्सनी अभिनय केलेल्या 'द लीजेंड ऑफ मौला जट' हा चित्रपट भारतातही प्रदर्शित होऊ शकतो. या चित्रपटाने जगभरात कमाईच्या बाबतीत किर्तीमान गाठला आहे. चित्रपटाने पाकिस्तानी चलनानुसार 10 दशलक्ष डॉलर्स म्हणजेच सुमारे 200 कोटींचा व्यवसाय केला आहे. या चित्रपटाची क्रेझ पाकिस्तानातच नाही तर जगातील अनेक देशांमध्ये पाहायला मिळत आहे.
भारतात रिलीजची तयारी
बॉलिवूड हंगामाच्या रिपोर्टमध्ये सूत्राच्या हवाल्याने दावा करण्यात आला आहे की, 'द लीजेंड ऑफ मौला जट' भारतात रिलीज करण्याची तयारी सुरू आहे. याची रिलीज डेट 23 डिसेंबर असल्याचे सांगितले जात आहे. विशेष म्हणजे याच दिवशी रणवीर सिंगचा मल्टीस्टारर चित्रपट सर्कस मोठ्या पडद्यावर येत आहे. अशा परिस्थितीत फवाद खानचा पाकिस्तानी चित्रपट भारतात प्रदर्शित झाला तर तो त्याच्या चाहत्यांसाठी एखाद्या ट्रीटपेक्षा कमी नसेल.
चिट्रपटाचे बजेट 100 कोटी
द लिजेंड ऑफ मौला जट हा पाकिस्तानी चित्रपटांच्या इतिहासातील सर्वात महागडा चित्रपट आहे. या चित्रपटाचे बजेट सुमारे 100 कोटी रुपये आहे. या चित्रपटाने बजेटनुसार चांगली कमाई केली आहे. चित्रपटाच्या अधिकृत इंस्टाग्रामनुसार, 21 नोव्हेंबरलाच चित्रपटाने 200 कोटी रुपयांचा (PKR) टप्पा ओलांडला होता. हा चित्रपट 13 ऑक्टोबर रोजी जगभरातील चित्रपटगृहात प्रदर्शित झाला.
फवाद आणि माहिराची बॉलिवूड एंट्री
फवाद खानने 2017 मध्ये 'खूबसूरत' या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. यामध्ये त्याच्यासोबत सोनम कपूर दिसली होती. यानंतर त्याने 'कपूर अँड सन्स' आणि 'ए दिल है मुश्किल' सारख्या चित्रपटात काम केले. फवाद जितका हँडसम मानला जातो, तितकाच लोकांना त्याचा अभिनय आवडतो. माहिरा खानदेखील शाहरुख खानच्या 'रईस' चित्रपटाद दिसली होती.