सुप्रसिद्ध असूनही ट्रेनने करतो प्रवास, कोट्यवधींची संपत्ती पण अगदी साधं आयुष्य जगतो हा बॉलिवूड गायक
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 24, 2024 15:01 IST2024-04-24T14:58:50+5:302024-04-24T15:01:09+5:30
सेलिब्रिटी म्हटलं तर आपसुकच आपल्या डोळ्यासमोर त्याची लक्झरी लाइफस्टाईल, महागड्या गाड्यांचं कलेक्शन तसेच एकुणच त्यांची जीवनशैली आठवते. पण बॉलिवूडचा हा गायक त्याला अपवाद आहे.

सुप्रसिद्ध असूनही ट्रेनने करतो प्रवास, कोट्यवधींची संपत्ती पण अगदी साधं आयुष्य जगतो हा बॉलिवूड गायक
Arijit Singh : आपल्या सुरेल गायनाने चाहत्यांना मंत्रमुग्ध करणारा बॉलिवूड सिंगर अरिजीत सिंह एका गाण्यासाठी कोटींच्या घरात मानधन घेतो. देशातील यशस्वी आणि प्रसिद्ध गायकांमध्ये अरिजीतचं नाव अग्रस्थानी आहे. 'सावंरिया' या हिंदी चित्रपटामध्ये प्ले बॅक सिंगर म्हणून काम करत त्याने इंडस्ट्रीत पाऊल ठेवलं. त्यानंतर 'आशिकी- २' मधील 'तुम ही हो' या गाण्यामुळे अरिजीत रातोरात स्टार बनला. सुमधूर गाणी आणि काळजाला भिडणारा आवाज ही त्याची खासियत आहे. सोशल मीडियावर अरिजीत सिंहचा मोठा चाहतावर्ग आहे.
अनेकदा अरिजीत सिंहला रस्त्यांवर पायात चप्पल, हातात कापडी थैली अशा अवस्थेत स्पॉट करण्यात आलंय. शिवाय अरिजीत सिंह बऱ्याचदा ट्रेन किंवा बसने प्रवास करताना दिसला आहे. कोट्यवधींची संपत्ती असूनही बॉलिवूडचा प्ले बॅक सिंगर अत्यंत साधं जीवन जगतो.
एका गाण्यासाठी आकारतो इतके पैसे-
अरिजीत सिंहने आपल्या आवाजाच्या जादूने संपूर्ण जगभरात आपली ओळख निर्माण केली आहे. मीडिया रिपोर्टनुसार, अरिजीत सिंह एका गाण्यासाठी जवळपास ८ ते १० लाख रुपये इतकी फीस आकारतो. त्याचबरोबर लाईव्ह कॉन्सर्टसाठी तो १.५ कोटी इतकं मानधन घेतो. तर अरिजीत सिंहचं नाव बॉलिवूडमधील सर्वाधिक मानधन घेणाऱ्या गायकांच्या यादीत अव्वल स्थानावर येतं. त्याची एकूण संपत्ती ५७ कोटींपेक्षा अधिक असल्याचं सांगण्यात येतं.