१६ पैकी १३ सिनेमे सुपरहिट, पण अभिनयात ठरले फेल! दिग्दर्शन क्षेत्रात क्रांती घडवणारा हा अवलिया तुम्हाला माहितीये का?

By ऑनलाइन लोकमत | Published: January 25, 2024 03:12 PM2024-01-25T15:12:38+5:302024-01-25T15:15:56+5:30

हिंदी सिनेसृष्टीत असे काही मोजके दिग्दर्शक आहेत ज्यांचे नाव आजही मोठ्या आदराने घेतले जाते.

Bollywood popular director subhash ghai know about his struggle before khalnayak movie | १६ पैकी १३ सिनेमे सुपरहिट, पण अभिनयात ठरले फेल! दिग्दर्शन क्षेत्रात क्रांती घडवणारा हा अवलिया तुम्हाला माहितीये का?

१६ पैकी १३ सिनेमे सुपरहिट, पण अभिनयात ठरले फेल! दिग्दर्शन क्षेत्रात क्रांती घडवणारा हा अवलिया तुम्हाला माहितीये का?

Subhash Ghai : हिंदी सिनेसृष्टीत बरेच दिग्दर्शख होऊन गेले ज्यांचे नाव आजही मोठ्या आदराने घेतले जाते. त्यातील एक नाव म्हणजे सुप्रसिद्ध दिग्दर्शक सुभाष घई आजला सुप्रसिद्ध लेखक, दिग्दर्शक आणि निर्माता म्हणून त्यांना बॉलिवूडमध्ये ओळखले जाते. सुभाष घई यांनी अनेक सुपरहिट सिनेमे दिले आहेत. त्याव्यतिरिक्त त्यांनी बॉलिवूडला अनेक स्टार्सही दिले आहेत, पण सुभाष घई अभिनय विश्वात कधीच पाय रोवू शकले नाही. एकेकाळी त्यांचे १६ पैकी १३ चित्रपट ब्लॉकबस्टर ठरले आणि इंडस्ट्रीला त्याचा मोठा फायदा झाला. सुभाष घई असे दिग्दर्शक आहेत ज्यांनी बॉलिवूडला अनेक निखरते तारे दिले पण स्वत: कधीच अभिनय केला नाही.

 सुभाष घई यांना बालपणापासून शिक्षणाची गोडी होती. महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी फिल्म अँड टीव्ही इन्स्टिट्यूटमधून सिनेक्षेत्राबद्दल शिक्षण घेतले. त्यानंतर त्यांनी अभिनयात पाऊल ठेवण्याचा विचार केला. आपल्या ध्येयाचा पाठलाग करत स्वप्नपूर्तीसाठी त्यांनी मुंबई गाठली. प्रचंड मेहनत त्याला प्रयत्नांची जोड देत त्यांनी अमाप संघर्ष केला पण त्यांना काही यश आले नाही. अखेरीस अभिनयाकडे पाठ फिरवत सुभाष घईंनी आपली पाऊले दिग्दर्शन क्षेत्राकडे वळवली.

यानंतर सुभाष घई यांनी दिग्दर्शनाच्या दुनियेत प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आणि १९७९ मध्ये शत्रुघ्न सिन्हा आणि रीना रॉय स्टारर 'कालीचरण' बनवला. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर यशस्वी ठरला. त्यानंतर दिग्दर्शक म्हणून घई यांचे नशीब फळफळले. या दिग्दर्शकाने बॉलीवूडला ताल, खलनायक, परदेस, राम-लखन, सौदागर, हीरो आणि कर्मा सारखे उत्तम चित्रपट दिले आहेत. ज्यांनी बॉक्स ऑफिसवर खळबळ उडवून दिली. पण, अभिनयाची क्रेझ अजूनही सुभाष घईंच्या मनातून गेलेली नाही. म्हणूनच ते त्यांच्या कोणत्याही चित्रपटात एक-दोन मिनिटांच्या छोट्या भूमिका करताना दिसतात. 

Web Title: Bollywood popular director subhash ghai know about his struggle before khalnayak movie

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.