चेन्नई पूरग्रस्तांसाठी बॉलिवूडची प्रार्थना
By ऑनलाइन लोकमत | Published: January 16, 2016 01:11 AM2016-01-16T01:11:28+5:302016-02-04T14:57:09+5:30
अमिताभ बच्चन, अभिषेक बच्चन, वरुण धवन, अनिल कपूर आदींनी चेन्नई पूरग्रस्तांच्या सुरक्षेसाठी ट्विटरद्वारे प्रार्थना केली आहे. अमिताभ बच्चन : ...
अ िताभ बच्चन, अभिषेक बच्चन, वरुण धवन, अनिल कपूर आदींनी चेन्नई पूरग्रस्तांच्या सुरक्षेसाठी ट्विटरद्वारे प्रार्थना केली आहे. अमिताभ बच्चन : चेन्नईत प्रलयच आलाय. येथील रहिवाशांच्या सुरक्षेसाठी आणि सर्व काही सुरळीत होण्यासाठी प्रार्थना. येथे स्वयंस्फूर्तीने स्वयंसेवक मदतकार्यासाठी पुढे येत आहेत, हे पाहून मन भरून आलंय.
अनिल कपूर : चेन्नईतल्या पुरानं हाहाकार माजवलाय. पूरग्रस्तांना वाचविण्यासाठी काही शूूर आणि उदार अंत:करणाचे नागरिक आपली घरे खुल्या दिलानं उपलब्ध करून देताहेत. आशेचा हा चंदेरी किरण समाधानकारक आहे.
अभिषेक बच्चन : माझी काळजी केल्याबद्दल सर्वांचे धन्यवाद. मी सुरक्षित आहे. या पुराचा फटका बसलेल्या नागरिकांच्या सुररक्षेसाठी मनोमन प्रार्थना.
रितेश देशमुख : चेन्नईतल्या पुराचं वाहिन्यांवरील चित्रीकरण पाहून खूप वेदना झाल्या. या पूरग्रस्तांसाठी प्रार्थना, या संकटातून ते लवकर बाहेर पडोत.
वरूण धवन : चेन्नई पूरग्रस्तांच्या कुटुंबीयांच्या सुरक्षेसाठी प्रार्थना. माझे हृदय त्यांच्या वेदनांनी हलले आहे.
रवीना टंडन : हे संकट पाहून मन भरून आलंय. रेनवॉटर हार्वेस्टिंगची गरज आहे. बेंगळुरूसारख्या शहरांचं अतिविकासामुळे आपण नुकसान केलंय. आता अशा ठिकाणी पाण्याचं दुर्भिक्ष्य जाणवतंय.