पत्नीला कारखाली चिरडण्याचा प्रयत्न करणारा निर्माता Kamal Kishore Mishraला अटक

By ऑनलाइन लोकमत | Published: October 28, 2022 10:00 AM2022-10-28T10:00:20+5:302022-10-28T10:10:19+5:30

पत्नीला कारखाली चिरडण्याचा प्रयत्न करणारा आरोपी चित्रपट निर्माता कमल किशोर मिश्राच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत.

Bollywood producer Kamal Kishore Mishra arrested will appear in court today | पत्नीला कारखाली चिरडण्याचा प्रयत्न करणारा निर्माता Kamal Kishore Mishraला अटक

पत्नीला कारखाली चिरडण्याचा प्रयत्न करणारा निर्माता Kamal Kishore Mishraला अटक

googlenewsNext

Kamal Kishore Mishra Arrested: पत्नीला कारखाली चिरडण्याचा प्रयत्न करणारा आरोपी चित्रपट निर्माता कमल किशोर मिश्राला पोलिसांनी अटक केली आहे. शुक्रवारी (आज) त्याला कोर्टासमोर हजर करण्यात येणार आहे. मुंबईतील आंबोली पोलिसांनी मिश्राविरुद्ध कलम २७९ आणि ३३८ अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या अपघातात मिश्राची पत्नी यास्मिन गंभीर जखमी झाली आहे. पत्नीच्या तक्रारीनंतर पोलिसांनी कमलविरुद्ध गुन्हा दाखल केला होता मात्र तो फरार झाला होता. अखेर त्याच्या मुसक्या पोलिसांनी गुरुवारी आवळल्या.

CCTVमध्ये कैद झाली घटना
निर्माता प्रोड्यूसर कमल किशोर मिश्राला परस्त्रीसोबत रंगेहाथ पकडल्याचे पाहून त्याने पत्नीवरच कार चढविली. यामध्ये त्याची पत्नी गंभीर जखमी झाली असून तिने पोलिसांकडे पतीने आपल्याला ठार मारण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप केला आहे. १९ ऑक्टोबरची ही घटना आहे. मिश्राची पत्नी जेव्हा त्याच्या घरी गेली तेव्हा तो त्याच्या कारमध्ये दुसऱ्या महिलेसोबत बसल्याचे तिने पाहिले. तिच्यासोबत रोमॅन्टिक झाला होता. दोघांना सोबत पाहून मी कारच्या काचेवर टकटक केले आणि काच खाली करण्यात सांगितले. परंतू, कमलकिशोरने कार घेऊन पळण्याचा प्रयत्न केला. मी त्याची कार थांबविण्यासाठी पुढे आले तर त्याने कार माझ्यावरून घातली. यामुळे माझ्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे, असे मिश्राच्या पत्नीने पोलिसांना सांगितले.

भूतियापा, फ्लॅट नंबर 420, शर्मा जी की लग गई, देहाती डिस्को, खली बली यांसारख्या अनेक चित्रपटांची निर्मिती  कमल किशोर मिश्राने केली आहे. 2019 मध्ये त्याने निर्माता म्हणून पदार्पण केले.

Web Title: Bollywood producer Kamal Kishore Mishra arrested will appear in court today

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.