बॉलिवूडच्या या सेलिब्रेटीने आतापर्यंत १०० लीटर ब्रेस्ट मिल्क केले दान, तिने समाजासमोर ठेवला आदर्श

By ऑनलाइन लोकमत | Published: October 18, 2021 04:29 PM2021-10-18T16:29:50+5:302021-10-18T16:30:10+5:30

लॉकडाऊनच्या काळात ही आई, इतरांसाठीही अमृतदायीनी ठरली.

Bollywood producer Nidhi Parmar donate 100 liters of breast milk so far, she set an example to the society | बॉलिवूडच्या या सेलिब्रेटीने आतापर्यंत १०० लीटर ब्रेस्ट मिल्क केले दान, तिने समाजासमोर ठेवला आदर्श

बॉलिवूडच्या या सेलिब्रेटीने आतापर्यंत १०० लीटर ब्रेस्ट मिल्क केले दान, तिने समाजासमोर ठेवला आदर्श

googlenewsNext

बॉलिवूड कलाकारांच्या स्ट्रगलबद्दल नेहमीच त्यांच्या चाहत्यांना कुतूहल वाटत असते. बऱ्याचदा त्यांचा संघर्ष आणि त्यांचा प्रवास वेगवेगळ्या माध्यमातून उलगडला जातो. मात्र नेहमीच पडद्यामागचे कलाकार मुख्य प्रवाहापासून दूर राहतात. त्यांच्याबद्दल फारसे लोकांना माहित नसते. अशा एका पडद्यामागच्या कलाकाराने केलेल्या कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे.

'सांड की आँख' या चित्रपटाची निर्माती निधी परमारने एका मुलाखतीत मोठा खुलासा केला. वयाच्या ३७ व्या वर्षी तिने 'एग्ज फ्रिज' केले असल्याचे तिने सांगितलं. आई होण्याची इच्छा तर होती, पण करिअरमध्ये कुठेही मागे न राहता त्यालाच प्राथमिकता देण्याचा निर्णय तिने घेतला होता. 
मुंबईत आल्यानंतर एका मोठ्या संघर्षाला सामोरे गेलो हे सांगताना आपण जाहिरात आणि टॅलेंट एजेंट म्हणून काम पाहिल्याचे निधीने सांगितले. ती म्हणाली, की काही वर्षांनीच तिची एका अशा व्यक्तीशी ओळख झाली, ज्या व्यक्तीने पुढे तिच्याशी विवाह केला. पुढे आई- वडिलांपासून संपूर्ण समाजापर्यंत सर्वाकडूनच तिला बाळाचा विचार केव्हा करणार असा प्रश्न विचारला जाऊ लागला. मला स्वत:ची निर्मिती संस्था सुरु करायची होती, यात कुटुंबाची मला साथ मिळाळी. निर्मिती संस्था सुरु झाल्यानंतर निधीने 'सांड की आँख'ची निर्मिती केली. 


निधीचे स्वप्न पूर्ण झाल्याची जाणीव झाल्यानंतर तिने गरोदर राहण्याचा निर्णय घेतला. वयाच्या ४० व्या वर्षी ती आई झाली, तेही अगदी नैसर्गितरित्या. लॉकडाऊनच्या काळात ही आई, इतरांसाठीही अमृतदायीनी ठरली. लॉकडाऊनच्या काळात तिने स्वत:चे जवळपास १०० लीटर ब्रेस्ट मिल्क तिने दान करत प्रसूतपूर्व काळापूर्वी जन्मलेल्या बाळांना नवसंजीवनी दिली.
निधी परमारने ब्रेस्ट मिल्क दान करण्यासाठी उचललेले पाऊल समाजापुढे आदर्श निर्माण करून गेला आहे.

Web Title: Bollywood producer Nidhi Parmar donate 100 liters of breast milk so far, she set an example to the society

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.