Video: राखी सावंतचं दुबईतील लक्झरी अपार्टमेंट पाहिलं का? बेडरुमपासून बाथरुमपर्यंत प्रत्येक वस्तू आहे युनिक
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 17, 2022 16:21 IST2022-06-17T16:20:23+5:302022-06-17T16:21:05+5:30
Rakhi sawant: राखीने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये तिने लिव्हिंग रुमपासून बेडरुमपर्यंत घरातील प्रत्येक कोपरा दाखवला आहे.

Video: राखी सावंतचं दुबईतील लक्झरी अपार्टमेंट पाहिलं का? बेडरुमपासून बाथरुमपर्यंत प्रत्येक वस्तू आहे युनिक
वायफळ बडबडीमुळे कायम चर्चेत येणारी ड्रामा क्वीन म्हणजे राखी सावंत (Rakhi Sawant) . गेल्या काही दिवसांपासून राखी तिच्या पर्सनल लाइफमुळे चर्चेत येत आहे. यात तिचं लव्हलाइफ जास्त चर्चिलं गेलं. रितेशपासून विभक्त झालेली राखी सध्या आदिल खान दुर्रानीला (Adil Khan Durrani) डेट करत असल्याचं सांगण्यात येतं. अलिकडेच आदिलने राखीला दुबईत एक घर खरेदी करुन दिलं. त्यामुळे या घराची सध्या सोशल मीडियावर चर्चा आहे. त्यातच राखीची एकूण संपत्ती किती, तिचं इनकम काय हे जाणून घेण्याची नेटकऱ्यांना उत्सुकता आहे.
सोशल मीडियावर सक्रीय असलेल्या राखीने नुकताच एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये तिने तिच्या नव्या घराची झलक चाहत्यांना दाखवली आहे. विशेष म्हणजे कलाविश्वात फारशी सक्रीय नसलेली राखी एका आलिशान घरात राहत असल्याचं या व्हिडीओवरुन दिसत आहे.
राखीने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये तिने लिव्हिंग रुमपासून बेडरुमपर्यंत घरातील प्रत्येक कोपरा दाखवला आहे. "तुम्हाला माझं दुबईमधील लक्झरी अपार्टमेंट पाहायचंय", असं म्हणत राखीने घर दाखवायला सुरुवात केली. दरम्यान, राखीच्या घरात व्हाइट, ब्राउन आणि चॉकलेटी रंगाचं कलर कॉम्बिनेशन करण्यात आलं आहे. तसंच मॉड्युलर किचन, महागड्या वस्तू, एलिगेंट थीमने हे घर सजलं आहे.