३-४ नव्हे तर रणबीरपेक्षा बरीच लहान आहे आलिया; जाणून घ्या दोघांच्या वयातील अंतर
By ऑनलाइन लोकमत | Published: April 14, 2022 12:44 PM2022-04-14T12:44:03+5:302022-04-14T12:45:41+5:30
Ranbir- Alia Wedding : मुळात, या दोघांकडे पाहिल्यावर त्यांच्यात काही अंतर असेल असं वाटत नाही. मात्र, या जोडीत बरंच अंतर आहे.
सध्या सामान्यांपासून ते सेलिब्रिटींपर्यंत एकाच गोष्टीची चर्चा रंगली आहे ते म्हणजे रणबीर-आलियाचं लग्न (Ranbir- Alia Wedding). गेल्या काही वर्षांपासून ही जोडी एकमेकांना डेट करत होती. त्यामुळे ही जोडी लग्नगाठ कधी बांधणार हा एकच प्रश्न चाहत्यांना पडला होता. मात्र, आता या सगळ्या प्रश्नांची उत्तरं चाहत्यांना मिळू लागली आहेत. येत्या काही काळात आलिया-रणबीर लग्न करणार असून काल (१३ एप्रिल) आलियाचा मेहंदी सोहळा मोठ्या थाटात पार पडला. विशेष म्हणजे ही जोडी सध्या चर्चेत येत असतानाच आता त्यांच्या वयातील अंतराविषयी चर्चा रंगली आहे.
बॉलिवूडमध्ये अशा अनेक सेलिब्रिटी जोड्या आहेत, ज्यांच्या वयामध्ये कमालीचं अंतर आहे. त्यामुळेच रणबीर- आलियाच्या वयात नेमकं किती अंतर असेल हा एकच प्रश्न सध्या नेटकऱ्यांना पडला आहे. मुळात, या दोघांकडे पाहिल्यावर त्यांच्यात काही अंतर असेल असं वाटत नाही. मात्र, या जोडीत बरंच अंतर आहे. त्यांच्या वयातील अंतरावरुन एक जुना किस्सादेखील आहे. याविषयी आलियानेच एका मुलाखतीत सांगितलं होतं.
प्रेमात सगळं काही माफ असतं असं म्हटलं जातं. तसंच काहीसं आलिया- रणबीरच्या बाबतीत घडलं आहे. आलिया ११ वर्षांची असताना तिची रणबीरसोबत पहिली भेट झाली होती. त्याचवेळी तिला रणबीर आवडला होता. त्यावेळी रणबीरच्या खांद्यावर डोकं ठेवावं असंही तिला वाटलं होतं. पण, ती लाजाळू असल्यामुळे तिला ते शक्य झालं नाही. त्यावेळी रणबीर २१ वर्षांचा असल्याचं सांगण्यात येतं. त्यामुळे या दोघांमध्ये जवळपास १० वर्षांचं अंतर आहे.
दरम्यान, आलिया, रणबीरपासून १० वर्षांनी लहान आहे. मात्र, या जोडीकडे पाहिल्यावर त्यांच्या वयातील अंतराचा जराही अंदाज लावता येत नाही. मागे वळून पाहताना दोघांच्याही वयात असणारं हे 10 वर्षांचं अंतर त्यांनाही लहान वाटत असणार यात शंका नाही. नात्यामध्ये असणाऱ्या या अंतराची केव्हाच दरी न वाटणं या साऱ्यासाठी स्वीकारार्हताही तितकीच महत्त्वाची.