बादशहा की हनी सिंग? ओळखा पाहून फोटोतील 'या' प्रसिद्ध रॅपरला
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 17, 2023 18:45 IST2023-03-17T18:41:19+5:302023-03-17T18:45:37+5:30
एका प्रसिद्ध रॅपरने त्याच्या बालपणीचा फोटो शेअर करुन नेटकऱ्यांना आश्चर्याचा धक्का दिला आहे. विशेष म्हणजे त्याच्याकडे पाहून हा लहानगा आता प्रसिद्ध रॅपर झालाय यावर कोणाचा विश्वास बसत नाहीये.

बादशहा की हनी सिंग? ओळखा पाहून फोटोतील 'या' प्रसिद्ध रॅपरला
कलाविश्वात आज अनेक दिग्गज कलाकारांची मांदियाळी आहे. उत्तम कलागुणांमुळे हे कलाकार चाहत्यांमध्ये लोकप्रिय होतात. त्यामुळे त्यांच्यावर प्रेम करणाऱ्या प्रत्येक चाहत्यांपर्यंत पोहोचण्यासाठी हे कलाकार सोशल मीडियाचा आधार घेत असतात. यात अनेक कलाकार त्यांच्या जीवनातील लहानमोठे प्रसंग, अनुभव, किस्से नेटकऱ्यांसोबत शेअर करतात. सध्या सोशल मीडियावर अशाच एका प्रसिद्ध रॅपरच्या बालपणीचा फोटो व्हायरल होत आहे.
ज्याप्रमाणे सोशल मीडियाच्या माध्यमातून दूरच्या व्यक्तीच्या संपर्कात राहता येतं. त्याचप्रमाणे काही जुन्या आठवणी जपूनही ठेवता येतात. त्यामुळे अनेक कलाकार त्यांच्या बालपणीचे फोटो शेअर करत असतात. यात एका प्रसिद्ध रॅपरने त्याच्या बालपणीचा फोटो शेअर करुन नेटकऱ्यांना आश्चर्याचा धक्का दिला आहे. विशेष म्हणजे त्याच्याकडे पाहून हा लहानगा आता प्रसिद्ध रॅपर झालाय यावर कोणाचा विश्वास बसत नाहीये. या फोटोमध्ये या रॅपरने भगवान शंकराचं रुप धारण केलं आहे.
सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या फोटोमध्ये दिसणारा चिमुकला प्रसिद्ध रॅपर हनी सिंग आहे. हनी सिंगने इन्स्टाग्रामवर त्याचे अनेक फोटो शेअर केले आहेत. त्यात हा फोटोदेखील शेअर केला आहे. या फोटोच्या माध्यमातून त्याने बालपणीच्या आठवणींना उजाळा दिला आहे.
दरम्यान, हा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर अनेक जणांनी तो रॅपर बादशहा असल्याचं म्हटलं. तर, काही चाहत्यांनी हनी सिंगला परफेक्ट ओळखलं. सध्या हा फोटो नेटकऱ्यांमध्ये व्हायरल होत आहे.