OMG! मोदींच्या ट्विटनंतर पूजा बेदीला आठवला देव; बॉलिवूडकर अॅक्टिव्ह
By ऑनलाइन लोकमत | Published: March 3, 2020 10:51 AM2020-03-03T10:51:08+5:302020-03-03T10:51:40+5:30
Narendra Modi: मोदींच्या ट्विटनं ट्विटरवर भूकंप
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोशल मीडिया सोडण्याचा विचार बोलून दाखवला आणि सोशल मीडियावर जणू भूकंप झाला. ‘ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम व यूट्यूब या सोशल मीडियावरील माझी अकाउंट्स येत्या रविवारपासून बंद करण्याचा विचार करत आहे. याविषयी पुढील माहिती नंतर देईन’ असे सोमवारी रात्री मोदींनी ट्विट करुन सांगितले. त्यांच्या या ट्विटनंतर सोशल मीडियावर एकच खळबळ माजली. त्यांना फॉलो करणा-या कोट्यवधी युजर्सनी त्यांच्या या ट्विटवर प्रतिक्रिया दिली. पंतप्रधानांनी हा निर्णय मागे घ्यावा यासाठी ‘नो सर’ हा ट्रेंड सुरु करण्यात आला आहे. जवळपास ५० हजारांहून जास्त लोकांनी मोदींच्या ट्विटला प्रतिक्रिया दिली बॉलिवूडही यात मागे नव्हते. अनेक सेलिब्रिटींनीही यावर प्रतिक्रिया दिली.
मोदींचे सोशल मीडियावर सर्जिकल स्ट्राईक
Modi Surgical Strike on @Twitter@Facebook & @instagram 😂😂👍🏻
— Ashoke Pandit (@ashokepandit) March 2, 2020
बॉलिवूडचे निर्माते अशोक पंडित यांनी मोदींच्या सोशल मीडिया सोडण्याच्या ट्विटवर प्रतिक्रिया दिली. ‘मोदींचे फेसबुक, ट्विटर आणि इन्स्टाग्रामवर सर्जिकल स्ट्राईक’, असे अशोक पंडित यांनी लिहिले. अशोक पंडित यांचे हे ट्विट लगेच व्हायरल झाले.
पूजा बेदी म्हणाली, ओह गॉड
Oh God!!!! 🤔🙈Makes me wonder if this means that @narendramodi wants us all to get off social media as well???? Will social media be the next ban in our threatened democracy ???
— Pooja Bedi (@poojabeditweets) March 3, 2020
How many of you would be okay if you woke up to find social media as gone as our 1000 rupee notes? https://t.co/uXU59nziR7
अभिनेत्री पूजा बेदीनेही ट्विट केले. ‘अरे देवो, काय आपण सर्वांनी सोशल मीडियाचा त्याग करावा, असे नरेंद्र मोदींची इच्छा आहे? लोकशाही धोक्यात आहे पाहून काय आता सोशल मीडियावरही पुढची बंदी लागणार?’, असे ट्विट पूजा बेदीने केले.
टेक अ ब्रेक
#Twitter has that effect sometimes, Sir. The whataboutery here can be exhausting. Just take a break. It will pass.
— Ranvir Shorey (@RanvirShorey) March 2, 2020
‘सोशल मीडियावर असणे कधी कधी थकवणारे असू शकते. थोडा ब्रेक घ्या. हा काळही जाईल,’ असे सांगत अभिनेता रणवीर शौरीने एकप्रकारे मोदींच्या सोशल मीडियापासून दूर जाण्याच्या निर्णयाचे समर्थन केले.