Salman Khan : सलमान खानने शेजाऱ्यावर ठोकला अब्रुनकसानीचा दावा, जाणून घ्या काय आहे भानगड?

By ऑनलाइन लोकमत | Published: January 15, 2022 02:42 PM2022-01-15T14:42:21+5:302022-01-15T14:42:38+5:30

Salman Khan : पाहा का आणि कोणावर ठोकलाय सलमाननं अब्रुनकसानीचा दावा.

bollywood salman khan plea for interim order in defamation suit against neighbour rejected | Salman Khan : सलमान खानने शेजाऱ्यावर ठोकला अब्रुनकसानीचा दावा, जाणून घ्या काय आहे भानगड?

Salman Khan : सलमान खानने शेजाऱ्यावर ठोकला अब्रुनकसानीचा दावा, जाणून घ्या काय आहे भानगड?

googlenewsNext

Salman Khan : बॉलीवूड सुपरस्टार (Bollywood Star) सलमान खानच्या (Salman) बाजूने कोणताही अंतरिम आदेश देण्यास मुंबई शहर दिवाणी न्यायालयाने शुक्रवारी नकार दिला. सलमान खानने त्याच्या एका शेजाऱ्यावर कथित अब्रुनकसानीचा (Salman Khan Defame Case) दावा दाखल केला होता. मुंबई जवळील पनवेल येथील त्याच्या फार्महाऊसजवळील जमिनीचा मालक केतन कक्कर यांनी एका यूट्यूब चॅनलशी बोलताना आपली बदनामी करण्याचा प्रयत्न केला, असा दावा सलमान खानने दाखल केलेल्या खटल्यात करण्यात आला आहे.

सलमान खानने दाखल केलेल्या दाव्यानुसार, केतन कक्कर यांच्या वतीने एका यूट्यूब चॅनलवर बोलताना त्याच्यावर आक्षेपार्ह टिप्पणी करण्यात आली होती. अशा परिस्थितीत, सलमाननं आपल्यावरील अपमानास्पद मजकूर काढून टाकला जावा आणि ज्या प्लॅटफॉर्मवर हा मजकूर उपलब्ध केला गेला आहे ते ब्लॉक केले जावेत अशी मागणी केली.

सलमान खानने यूट्यूब (Youtube) , फेसबुक (Facebook), ट्विटर (Twitter) या सोशल मीडिया (Social Media) प्लॅटफॉर्म्सनाही त्याच्या खटल्यात पक्षकार बनवले आहे आणि त्यांच्या वेबसाइटवरून आपल्यावर केलेली आक्षेपार्ह टिप्पणी ब्लॉक करण्याचे निर्देश देण्याची मागणी केली आहे. यापूर्वी १४ जानेवारी रोजी शहर दिवाणी न्यायालयात न्यायाधीश अनिल एच. लद्दड यांनी सलमान खानच्या या खटल्याची सुनावणी केली होती.

कक्कर यांच्या वकिलांनी मागितली वेळ
दरम्यान, केतन कक्कर यांच्या वकिलांनी न्यायालयाकडे थोडा वेळ मागितला आहे. तसंच आदल्या दिवशी संध्याकाळीच आपल्याला कागदपत्रे मिळाली असून या प्रकरणाची माहिती घेण्यासाठी वेळही मिळाला नसल्याचं त्यांनी न्यायालयाला सांगितलं. जर सलमान खान खटला दाखल करण्यासाठी एका महिन्याची वाट पाहू शकतो, तर आपल्याला उत्तर देण्यासाठी थोडा वेळ मिळाला पाहिजे अशीही विनंती त्यांनी केली.

Web Title: bollywood salman khan plea for interim order in defamation suit against neighbour rejected

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.