ऐश्वर्या की कतरिना? जेव्हा करणच्या सांगण्यावरुन सलमानला करावी लागली होती एकीची निवड
By ऑनलाइन लोकमत | Published: March 3, 2023 07:30 PM2023-03-03T19:30:00+5:302023-03-03T19:30:00+5:30
Salman khan: सलमानचं उत्तर ऐकून करणही थक्क झाला होता.
बॉलिवूड अभिनेता सलमान खान (Salman Khan) याचं फिल्मी करिअर जितकं चर्चेत असतं त्याहून कैकपटीने त्याच्या वैयक्तिक जीवनाची चर्चा रंगत असते. यात खासकरुन त्याच्या लग्नाविषयी कायमच चर्चा होताना दिसते. आतापर्यंत सलमानचं नाव अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं आहे. यात ऐश्वर्यासोबत असलेल्या त्याच्या नात्याची चर्चा आजही रंगताना पाहायला मिळते. सध्या सोशल मीडियावर सलमानचा एक जुना व्हिडीओ व्हायरल होत आहे. यात त्याला ऐश्वर्या (Aishwarya rai Bachchan) आणि कतरिनापैकी (katarina kaif) एकीची निवड करायला सांगण्यात आलं होतं.
काही वर्षांपूर्वी सलमानने करण जोहरच्या 'कॉफी विथ करण' या कार्यक्रमात हजेरी लावली होती. या शोमध्ये करणने सलमानला ऐश्वर्या आणि कतरिनापैकी एकीची निवड करायला सांगितली होती. विशेष म्हणजे सलमानने क्षणाचाही विलंब न लावता पटकन त्याच्या आवडत्या अभिनेत्रीचं नाव घेतलं. त्यामुळे सध्या हा व्हिडीओ व्हायरल होत आहे.
सवत हेलन यांना स्वीकारताना सलमावर झाला होता 'हा' परिणाम; बऱ्याच वर्षाने अरबाजने केला खुलासा
काय होता करणचा प्रश्न
'कतरिना आणि ऐश्वर्या या दोघींपैकी सगळ्यात उत्कृष्ट अभिनेत्री कोण आहे?'असा प्रश्न करणने सलमानला विचारला. त्यावर क्षणाचाही विलंब न लावता सलमानने पटकन ऐश्वर्या राय-बच्चन असं नाव घेतलं. भाईजानचं हे उत्तर ऐकून करणही चाट पडला होता.
दरम्यान, ऐश्वर्यानंतर सलमानचं नाव अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं होतं. यात संगीता बिजलानी, कतरिना कैफ यांसारख्या लोकप्रिय अभिनेत्री आहेत. लवकरच सलमानचा किसी का भाई किसी की जान हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्यामुळे सध्या तो या चित्रपटामध्ये बिझी आहे.