वयाच्या ३८व्या वर्षीही अविवाहित आहे मराठमोळी सुंदरी, एकटीच करोडो रुपयांची मालकीण!
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 5, 2025 15:45 IST2025-03-05T15:43:58+5:302025-03-05T15:45:52+5:30
तिच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल जाणून घेण्यासाठी चाहते नेहमीच उत्सुक असतात.

वयाच्या ३८व्या वर्षीही अविवाहित आहे मराठमोळी सुंदरी, एकटीच करोडो रुपयांची मालकीण!
बॉलिवूडमध्ये अनेक अशा अभिनेत्री आहेत, ज्यांनी यशाच शिखर तर गाठलं. पण, अद्याप त्या अविवाहित आहेत. मात्र, त्याच्या प्रेमप्रकरणांची चर्चा नेहमीच चर्चेत असते. आज आम्ही अशाच एका अभिनेत्रीबद्दल सांगणार आहोत, जिने नुकताच तिचा ३८ वा वाढदिवस साजरा केला. इतकेच नाही तर या अभिनेत्रीने कुणी तगडा हिरो सोबतीला नसताना अनेक हिट चित्रपट बॉलिवूडला दिले आहेत. अभिनेत्रीनं अनेक मोठ्या स्टार्सला डेटही केलं आहे. असे असूनही ही अभिनेत्री आजही अविवाहित आहे, परंतु ती एकटीच करोडोंची मालकिन आहे.
अभिनेत्रीचं सौंदर्य, तिचा मनमोहक लूक, ज्यातून चाहते नजर हटवू शकत नाहीत. तिचे फक्त भारतामध्येच नाही तर जगभरात चाहते आहेत. ही अभिनेत्री आहे श्रद्धा कपूर (Shraddha Kapoor). एकटे आयुष्य जगणारी श्रद्धा चाहत्यांची आवडती आहे. इंस्टाग्रामवर सर्वाधिक फॉलोअर्स असलेल्या स्टार्सच्या यादीतही तिचं नाव अव्वल आहे. श्रद्धाच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल जाणून घेण्यासाठी चाहते नेहमीच उत्सुक असतात.
मराठमोळी श्रद्धाचं मुंबईतील जुहू येथे घर आहे. फायनान्शियल एक्सप्रेसच्या रिपोर्टनुसार, या घराची किंमत ६० कोटी रुपये आहे. लाईफस्टाईल एशियाच्या रिपोर्टनुसार, श्रद्धाची एकूण संपत्ती १२३ कोटी (Shraddha Kapoor Net Worth) रुपये आहे. ती एका चित्रपटासाठी ५ ते ७ कोटी रुपये मानधन घेते. एवढेच नाही तर जाहिरातींमध्ये काम करण्यासाठी ती मोठी रक्कम देखील घेते. श्रद्धाला गाड्यांचीही भारी हौस आहे. तिच्याकडे अनेक आलिशान गाड्या आहेत. लव्हलाईफबद्दल बोलायचं झालं तर सध्या अभिनेत्रीचं नाव लेखक राहुल मोदी याच्याशी जोडलेलं आहे. श्रद्धाच्या फोन स्क्रीनवर राहुलचा फोटोही दिसला आहे. दोघेही लवकरच लग्न करणार असल्याची चर्चा आहे.