"त्यांचं नाव खराब करू नका..." ए. आर. रहमान यांच्या समर्थनार्थ पत्नी सायरा बानो यांनी केलेल्या वक्तव्याची चर्चा

By ऑनलाइन लोकमत | Published: November 25, 2024 09:53 AM2024-11-25T09:53:44+5:302024-11-25T09:56:59+5:30

सुप्रसिद्ध बॉलिवूड संगीतकार, गायक ए. आर. रहमान (AR Rahman) सध्या त्यांच्या घटस्फोटामुळे चर्चेत आहेत

bollywood singer a r rahman wife saira banu comes out his defence says he is best man in the world | "त्यांचं नाव खराब करू नका..." ए. आर. रहमान यांच्या समर्थनार्थ पत्नी सायरा बानो यांनी केलेल्या वक्तव्याची चर्चा

"त्यांचं नाव खराब करू नका..." ए. आर. रहमान यांच्या समर्थनार्थ पत्नी सायरा बानो यांनी केलेल्या वक्तव्याची चर्चा

AR Rahman Wife Saira Banu Statement: सुप्रसिद्ध बॉलिवूड संगीतकार, गायक ए. आर. रहमान (AR Rahman) सध्या त्यांच्या घटस्फोटामुळे चर्चेत आहेत. ए. आर. रहमान. यांना त्यांच्या घटस्फोटाच्या घोषनेनंतर सोशल मीडियावर ट्रोलिंगचा सामना करावा लागत आहे. त्यावर आता त्यांची पत्नी सायरा बानो यांनी अखेर मौन सोडलं आहे. जवळपास लग्नाच्या २९ वर्षानंतर ए. आर. रहमान- सायरा बानो यांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला. ए. आर. रहमान यांच्या या निर्णयाने चाहत्यांना धक्काच बसला आहे. घटस्फोटाच्या घोषनेनंतर त्यांची बँड मेंबर मोहिनी डेने तिच्या पतीपासून विभक्त होत असल्याचे जाहीर केल्यानंतर सोशल मीडियावर खळबळ माजली. मोहिनी डेच्या घटस्फोटाच्या पोस्टनंतर नेटकरी ए.आर. रहमान आणि सायरा बानो यांच्या घटस्फोटाला ती कारणीभूत असेल का? असे तर्कवितर्क लावण्यात आले. दरम्यान, आता या अफवांना सायरा बानो यांनी पूर्णविराम दिला आहे. 

ए. आर. रहमान यांची पत्नी सायरा बानो यांच्या वकील वंदना शाह यांनी नुकतीच एक स्टेटमेंट जारी केली आहे. या स्टेटमेंटमध्ये सायरा बानो यांनी ए. आर. रहमान यांना सपोर्ट दर्शवल्याचं पाहायला मिळतंय. या स्टेटमेंटमध्ये त्यांनी म्हटलंय, "मी सध्या मुंबईत आहे आणि शारिरीकदृष्ट्या कमजोर आहे.  याच कारणामुळे मी आतापर्यंत गप्प होते. परंतु आता मी सर्व युट्यूबर्स तसेच तमिळ मीडियाला विनंती करते की कृपया तुम्ही ए. आर. रहमान यांच्या विरोधात चुकीच्या अफवा पसरवू नका. ए .आर .रहमान जगातली सर्वात चांगला माणूस आहे. त्यांच्यासारखा माणूस शोधूनही सापडणार नाही. मी तुम्हाला विनंती करते की यावेळी तुम्ही त्यांना सपोर्ट करा."

या पुढे स्टेटमेंटमध्ये सायरा बानो म्हणाल्या, "माझ्या त्यांच्यावर अतूट विश्वास आहे, जो आयुष्यभर असेल. माझी तुम्हा सर्वांना विनंती आहे की ते जसे आहेत तसे त्यांना राहुद्या. जोपर्यंत आम्ही कायदेशीररित्या घटस्फोट होत नाही तोवर तुम्ही कोणत्याही पद्धतीच्या अफवा पसरवू नका किंवा ए. आर. रहमान यांचं नाव कोणासोबतही जोडू नका. तो खरंच खूप चांगला माणूस आहे. त्यांचं नाव खराब करू नका."

मुलांनी पालकांच्या निर्णयाचा केला आदर 

ए आर रहमान आणि सायरा बानो यांना तीन मुले आहेत. खतिजा आणि रहीमा या दोन मुली आणि अमीन रहमान नावाचा मुलगा. त्यांच्या या निर्णयात त्यांची मुलेही त्यांच्यासोबत आहेत आणि त्यांच्या निर्णयाचा आदर करतात.

Web Title: bollywood singer a r rahman wife saira banu comes out his defence says he is best man in the world

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.