सेम नावामुळे घोळ! दोन पत्नी असलेल्या युट्यूबरवर संतापला सिंगर अरमान मलिक, म्हणतो- "बिग बॉसमध्ये..."
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 9, 2024 11:13 IST2024-07-09T11:13:05+5:302024-07-09T11:13:36+5:30
यंदाच्या पर्वात युट्यूबर अरमान मलिकला त्याच्या दोन पत्नींसह सहभागी झालेलं पाहून प्रेक्षकांच्याही भुवया उंचावल्या. पण, याचा नाहक त्रास प्रसिद्ध बॉलिवूड सिंगर अरमान मलिकला होत आहे. याबाबत संताप व्यक्त करत त्याने पोस्ट लिहिली आहे.

सेम नावामुळे घोळ! दोन पत्नी असलेल्या युट्यूबरवर संतापला सिंगर अरमान मलिक, म्हणतो- "बिग बॉसमध्ये..."
Bigg Boss OTT 3: 'बिग बॉस ओटीटी'च्या तिसऱ्या पर्वाला काही दिवसांपूर्वीच सुरुवात झाली. यंदाच्या पर्वात युट्यूबर अरमान मलिकला त्याच्या दोन पत्नींसह सहभागी झालेलं पाहून प्रेक्षकांच्याही भुवया उंचावल्या. पायल आणि कृतिकाबरोबर 'बिग बॉस'च्या घरात गेलेल्या अरमान मलिकला अनेकांनी ट्रोलही केलं आहे. पण, याचा नाहक त्रास प्रसिद्ध बॉलिवूड सिंगर अरमान मलिकला होत आहे. याबाबत संताप व्यक्त करत त्याने पोस्ट लिहिली आहे.
सिंगर अरमान मलिकने त्याच्या X अकाऊंटवरुन एक ट्वीट केलं आहे. या ट्वीटमधून त्याने संतप्त प्रतिक्रिया दिली आहे.
मी याकडे दुर्लक्ष करण्याचा प्रयत्न केला. पण, आता हे हाताबाहेर जात आहे आणि यावर बोलणं गरजेचं आहे.
सुरुवातीला संदीप नावाने ओळखल्या जाणाऱ्या युट्यूब क्रिएटरने त्याचं नाव बदलून अरमान मलिक केलं. आणि आता तो बिग बॉस ओटीटी ३मध्ये सहभागी झाला आहे. या नावामुळे अनेकांचा गैरसमज झाला आहे. मीच तो अरमान मलिक असल्याचं समजत अनेक जण मला टॅग करत आहेत.
मी हे सांगू इच्छितो की या व्यक्तीशी माझा काहीही संबंध नाही. मी त्याचं आणि त्याच्या लाइफस्टाइलचं कोणत्याही पद्धतीने समर्थन करत नाही. यामुळे माझं नाव खराब होतंय आणि अनेक लोकांची दिशाभूल होत आहे. जे मला कित्येक वर्षांपासून सपोर्ट करत आहेत. मी कोणालाही त्यांचं नाव बदलण्यापासून किंवा माझ्या नावासारखं सेम नाव ठेवण्यापासून रोखू शकत नाही. पण, यातून बाहेर येण्यासाठी मला मदत करण्याची विनंती मी तुम्हाला करत आहे.
कृपया त्याच्या संबंधित असलेल्या पोस्टमध्ये मला टॅग करू नका. मला समजून घेतल्याबद्दल आणि पाठिंबा दिल्याबद्दल, धन्यवाद.
-अरमान मलिक
This had to be said. #ArmaanMalikpic.twitter.com/GB7HjuijtP
— ARMAAN MALIK (@ArmaanMalik22) July 8, 2024
सिंगर अरमान मलिकच्या या पोस्टवर चाहत्यांनी कमेंट करत त्याला पाठिंबा दर्शविला आहे. याआधीही अरमान मलिकने युट्यूबरबाबत पोस्ट शेअर करत संताप व्यक्त केला होता.