B Praak Newborn Child Death: 'तेरी मिट्टी' फेम बी. प्राकच्या नवजात बाळाचं निधन; गायकाने शेअर केली काळजाचा ठाव घेणारी पोस्ट
By ऑनलाइन लोकमत | Published: June 15, 2022 10:04 PM2022-06-15T22:04:28+5:302022-06-15T22:04:33+5:30
B Praak Newborn Child Death: जन्मानंतर अवघ्या काही वेळातच बाळानं जगाचा निरोप घेतला.
B Praak Newborn Child Death: प्रसिद्ध गायक बी प्राक यानं तो आणि त्याची पत्नी पुन्हा एकदा आई-वडिल होणार असल्याची माहिती दिली होती. सोशल मीडियावरही त्यानं अनेकदा आपल्या पत्नीसोबतचे फोटो शेअर केले होते. परंतु याचदरम्यान, आता एक दु:खद बातमी समोर आली आहे. आपल्या दुसऱ्या नवजात बालकाचं निधन झाल्याची माहिती त्यानं दिली. जन्मानंतर अवघ्या काही वेळातच त्या नवजात बालकानं जगाचा निरोप घेतला.
“आमच्या दुसऱ्या बाळाचं निधन झालं हे सांगताना अतिव दु:ख होत आहे. जन्मानंतर अवघ्या काही वेळातच बाळानं जगाचा निरोप घेतला. आई-वडिल म्हणून आमच्या आयुष्यातील सर्वात मोठा दु:खाचा क्षण आहे. आम्ही सर्व डॉक्टर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी केलेल्या प्रयत्नांचे आभार मानतो. आमच्या प्रायव्हसीचा आदर कराल अशी अपेक्षा करतो. सर्वांच्या प्रार्थनांची आवश्यकता आहे. तुमचा लाडका बी प्राक आणि मीरा,” अशी पोस्ट त्यानं आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून केली आहे.
बी प्राकच्या पत्नीचं नाव मीरा बच्चन असं आहे. आपण पुन्हा एकदा आईवडिल बनणार असल्याचं त्यांनी एप्रिल महिन्यात सर्वांसोबत शेअर केलं होतं. बी प्राक आणि मीरा यांनी ४ एप्रिल २०१९ मध्ये विवाह केला होता. त्या दोघांचा एक मुलगाही आहे. त्याचं नाव अदब असं आहे.