Singer Jubin Nautiyal: ज्युबिनला रुग्णालयातून मिळाला डिस्चार्ज; 'आईच्या मांडीवर डोकं ठेऊन..'
By ऑनलाइन लोकमत | Published: December 14, 2022 01:14 PM2022-12-14T13:14:57+5:302022-12-14T13:17:57+5:30
प्रसिद्ध गायक जुबिन नोटियालचा काही दिवसांपुर्वीच अपघात झाला होता. रुग्णालयातुन डिस्चार्ज मिळाल्यानंतर त्याचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
Singer Jubin Nautiyal: बॉलिवुडचा प्रसिद्ध गायक जुबिन नोटियालचा काही दिवसांपुर्वीच अपघात झाला होता. त्याला गंभीर दुखापत झाल्याने त्वरित रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. आता जुबिनला रुग्णालयातुन डिस्चार्ज मिळाला असून त्याने आईच्या मांडीवर शांत झोपल्याचा फोटो शेअर केला आहे.
बॉलिवूड सिंगर जुबिन नौटियाल काही दिवसांपुर्वी जिन्यावरुन खाली पडला होता. रुग्णालयातुन डिस्चार्ज मिळाल्यानंतर ज्युबिनने आईच्या मांडीवर डोकं ठेऊन शांत झोपल्याचा फोटो पोस्ट केला आहे. त्याच्या हातावर जखम दिसून येतेय. 'An early dose of Vitamin Mom' असे छानसे कॅप्शन त्याने दिले आहे.
जुबिनच्या डोक्याला, बरगड्या आणि कोपराला दुखापत झाली होती .अपघातानंतर त्याच्या उजव्या हाताचे ऑपरेशनही झाले. डॉक्टरांनी त्याला उजव्या हाताचा वापर न करण्याचा सल्ला दिला आहे.
गायक जुबिन नौटियालने मेहनतीच्या जोरावर इंडस्ट्रीत आपलं नाव कमावलं आहे. अलीकडे त्याची एकापाठोपाठ एक गाणी रिलीज झाली आहेत. यामध्ये 'माणिके योहानी' आणि 'गोविंदा नाम मेरा' या चित्रपटातील बना शराबी या गाण्यांचा समावेश आहे.