"खरं काय ते माहीत नसताना...", नेहा कक्करसाठी धावून आला पती रोहनप्रीत सिंग, ट्रोलर्सला सुनावलं

By सुजित शिर्के | Updated: March 28, 2025 16:34 IST2025-03-28T16:31:52+5:302025-03-28T16:34:05+5:30

"ट्रोल करणं चुकीचं आहे...", नेहा कक्करसाठी धावून आला पती रोहनप्रीत सिंग, टीकाकारांना सुनावलं

bollywood singer neha kakkar husband rohanpreet singh reaction on melbourne concert shared post | "खरं काय ते माहीत नसताना...", नेहा कक्करसाठी धावून आला पती रोहनप्रीत सिंग, ट्रोलर्सला सुनावलं

"खरं काय ते माहीत नसताना...", नेहा कक्करसाठी धावून आला पती रोहनप्रीत सिंग, ट्रोलर्सला सुनावलं

Neha Kakkar: बॉलिवूड इंडस्ट्रीतील लोकप्रिय गायिका नेहा कक्कर (Neha Kakkar)  तिच्या गाण्यांमुळे अनेकदा चर्चेत येते. आपल्या गोड आवाजाने तिने प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केलं.सध्या नेहा कक्कर मेलबर्न येथील कॉन्सर्टमुळे चर्चेत आली आहे. नुकत्याच ऑस्ट्रेलियातील मेलबर्न येथे झालेल्या कॉन्सर्टसाठी ३ तास उशिरा पोहोचली. त्यामुळे तिची वाट पाहून वैतागलेले प्रेक्षक प्रचंड भडकले. इतकंच नाही तर जेव्हा नेहा स्टेजवर आली तेव्हा सगळ्यांनी तिला परत जाण्यास सांगितलं. या प्रकरणामुळे गायिकेला सोशल मीडियावर प्रचंड ट्रोलिंगचा सामना करावा लागत आहे. 


दरम्यान, नेहा कक्करने याबद्दल सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत स्पष्टीकरण सुद्धा दिलं. नेहा कक्करच्या होणाऱ्या ट्रोलिंगसाठी तिचा भाऊ देखील बहिणीला पाठिंबा देण्यासाठी धावून आला. अशातच नुकतीच तिचा पती रोहनप्रीत सिंगने इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर करत पत्नीची बाजू मांडली आहे. 

रोहन प्रीत सिंगने पत्नी नेहा कक्करसाठी सोशल मीडियावर शेअर केलेल्या या पोस्टमध्ये लिहिलंय, "मी सगळ्यांना विनंती करतो आणि एक गोष्ट सांगू इच्छितो, जोपर्यंत आपल्याला खरं काय आहे माहित नसतं किंवा त्या घटनेच्या दोन्ही बाजू माहीत नसतात. तेव्हा कोणालाही ट्रोल करणं चुकीचं आहे. मी तर म्हणतो या गोष्टीचं प्रत्येकाने आयुष्यात पालन करावं. मी माझी पत्नी आणि तिच्या बॅण्डची आदर करतो. कारण त्या तणावाच्या परिस्थितीतही त्यांनी स्टेजवर जाऊन परफॉर्म करण्याची हिंमत दाखवली." असं त्याने पोस्टमध्ये लिहिलं आहे. 

वर्कफ्रंट

नेहा कक्कर बॉलिवूड इंडस्ट्रीतील आघाडीची गायिका आहे. 'सन्नी सन्नी’, ‘मनाली ट्रेंस’, ‘आओ राजा’, ‘धतिंग नाच’, ‘लंदन ठुमकदा’ आणि ‘जादू की झप्पी’ यांसारख्या हिंदी गाण्यांना तिने आपला आवाज दिला. 

Web Title: bollywood singer neha kakkar husband rohanpreet singh reaction on melbourne concert shared post

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.