लग्नाच्या ४ वर्षानंतर सेलिब्रिटी जोडप्याच्या घरी चिमुकल्या पाहुण्याचं आगमन; मुलाच्या नावाचा अर्थ आहे खास
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 20, 2025 11:31 IST2025-02-20T11:26:16+5:302025-02-20T11:31:04+5:30
प्रसिद्ध सेलिब्रिटी जोडप्याला पुत्ररत्न; दोन महिन्यानंतर जाहीर केलं मुलाचं नाव, अर्थही आहे खास

लग्नाच्या ४ वर्षानंतर सेलिब्रिटी जोडप्याच्या घरी चिमुकल्या पाहुण्याचं आगमन; मुलाच्या नावाचा अर्थ आहे खास
Sachet-Parampara: लोकप्रिय बॉलिवूड (Bollywood) संगीतकार, गायक सचेत आणि परंपरा ( Sachet Parampara)ही जोडी सध्या चर्चेत आहे. अलिकडेच त्यांच्या घरी चिमुकल्या पाहुण्याचं आगमन झालं आहे. सचेत-परंपरा लग्नानंतर चार वर्षांनी आई-बाबा झाले आहेत. परंपराने गोंडस मुलाला जन्म दिला आहे. सोशल मीडियावर याबाबत माहिती देत त्यांनी ही आनंदाची बातमी चाहत्यांसोबत शेअर केली होती.
सचेत पंरपराला मुलगा झाला आहे. या नव्या जगात तुझं स्वागत आहे क्रिथ टंडन. "आमच्या लहान बाळाला चांगलं आरोग्य लाभो आणि ते कायम आनंदित राहो, असे त्याला आशीर्वाद द्या. तुमच्या सर्वांचं प्रेम आणि शुभेच्छांसाठी धन्यवाद...!" असं म्हणतं सचेत-परंपराने त्यांच्या लेकाचं नाव देखील जाहीर केलं आहे. 'क्रिथ' या नावाचा अर्थ कल्पक, लोकप्रिय असा होतो. त्याचबरोबर या पोस्टमध्ये त्यांनी बाळाची झलक दाखवली आहे. शिवाय मुलाचं नामकरण करण्यासाठी ते राधा-कृष्ण मंदिरात गेले आहेत. दरम्यान, सचेत-परंपराने शेअर केलेल्या पोस्टवर नेटकऱ्यांनी या कौतुकाचा वर्षाव केला आहे.
सचेत व परंपरा दोघेही ‘द व्हॉईस इंडिया’च्या सेटवर पहिल्यांदा भेटले होते. त्यानंतर एकत्र काम करत असताना ते एकमेकांच्या प्रेमात पडले आणि त्यांनी साखरपुडा केला. मग २७ नोव्हेंबर २०२० रोजी त्यांनी खासगी सोहळ्यात लग्नगाठ बांधून नव्या आयुष्याला सुरुवात केली.
वर्कफ्रंट
सचेत परंपरा यांची 'बेखयाली','मलंग सजना','जा रांझन रांझन'.'मैय्या मेनू' यासारखी अनेक गाणी गाजली. 'शिव तांडव स्तोत्र'च्या व्हिडिओनंतर त्यांना लोकप्रियता मिळाली होती. आज ते बॉलिवूडमधील लोकप्रिय गायकांपैकी एक आहेत.