चाहत्यांसाठी भर पावसात शानने गायलं 'फना' चित्रपटातील गाणं; नेटकरी म्हणाले,'सच्चा कलाकार...'

By ऑनलाइन लोकमत | Published: October 21, 2024 11:37 AM2024-10-21T11:37:14+5:302024-10-21T11:41:40+5:30

बॉलिवूडमधील प्रसिद्ध गायक शान मुखर्जी (Shaan Mukherji) म्हणजेच शानने  गोड आवाजाने कायमच चाहत्यांना मंत्रमुग्ध केलं.

bollywood singer shaan mukherji sang the song from the movie fanaa in rain for fans the video went viral | चाहत्यांसाठी भर पावसात शानने गायलं 'फना' चित्रपटातील गाणं; नेटकरी म्हणाले,'सच्चा कलाकार...'

चाहत्यांसाठी भर पावसात शानने गायलं 'फना' चित्रपटातील गाणं; नेटकरी म्हणाले,'सच्चा कलाकार...'

Shaan Mukherji:बॉलिवूडमधील प्रसिद्ध गायक शान मुखर्जी (Shaan Mukherji) म्हणजेच शानने  गोड आवाजाने कायमच चाहत्यांना मंत्रमुग्ध केलं. इंडी पॉप ते बॉलिवूडमध्ये एकाहून एक सुपरहिट गाण्यांना आपला आवाज देणारा शान आजही श्रोत्यांच्या मनावर राज्य करत आहे. अशातच  सध्या शानने केलेल्या एका कृतीमुळे तो चर्चेत आला आहे. 


अलिकडेच मुंबईतील 'जियो वर्ल्ड ड्राइव्ह' येथे त्यांचा एक लाईव्ह आयोजित करण्यात आला होता. अशातच लाईव्ह शोदरम्यान  पावसाने हजेरी लावल्याने चाहत्यांची निराशा झाली होती. असं असतानाही शाननं त्यांचं गाणं थांबवलं नाही. चाहत्यांच्या प्रेमापोटी तो गातच राहिला. त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये शान डोक्यावर छत्री पकडून भर पावसात आपलं सादरीकरण करताना दिसत आहे.

या व्हायरल व्हिडीओमध्ये शान लाईव्ह शोमध्ये उपस्थित असलेल्या संगीतप्रेमींना म्हणतो,"मी तर छत्री घेऊन गात आहे. पावसात भिजू नये यासाठी मी हे सगळं करतोय असं नाही, तर माईक भिजता कामा नये यासाठी छत्री घेऊन उभा आहे. नाहीतर पावसात भिजायला मला खूप आवडतं". त्यानंतर त्याने गाणं 'दिल ने तुमको चुन लिया है' गाण्यास सुरूवात केली.

सोशल मीडियावर शानचा हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे. शिवाय त्याच्या चाहत्यांनी हा व्हिडीओ पाहून त्याचं तोंडभरून कौतुक केलं आहे. या व्हिडीओवर एका चाहत्याने  प्रतिक्रिया देत म्हटलंय," हे क्षण अविस्मरणीय आहेत. हा एक ओपन कॉन्सर्ट होता. त्यामध्ये सगळेजण उत्साहित होते, पण अचानक पाऊस पडला आणि सगळ्यांची निराशा झाली. परंतु शान अखेरपर्यंत स्टेजवर परफॉर्म करत राहिले. पावसामुळे सगळे भिजले होते, शानदेखील भिजले तरीही ते गात राहिले हे पाहिल्यावर एक सच्चा कलाकार काय असतो, याची जाणीव झाली". 

Web Title: bollywood singer shaan mukherji sang the song from the movie fanaa in rain for fans the video went viral

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.