प्रसिद्ध गायिकेचा फोन नंबर झाला लीक; 1 तासात १०० पेक्षा जास्त फोन कॉल्स
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 3, 2023 13:45 IST2023-09-03T13:44:59+5:302023-09-03T13:45:51+5:30
Bollywood singer: या अभिनेत्रीला नाहक त्रासाला बळी जावं लागत आहे.

प्रसिद्ध गायिकेचा फोन नंबर झाला लीक; 1 तासात १०० पेक्षा जास्त फोन कॉल्स
आपल्या दमदार आवाजामुळे बॉलिवूडमध्ये आपलं स्थान निर्माण करणारी प्रसिद्ध गायिका म्हणजे सोना मोहपात्रा. उत्तम आवाज आणि स्पष्टवक्तेपणा यामुळे सोना कायम चर्चेत असते. परंतु, यावेळी ती एका वेगळ्या कारणामुळे चर्चेत आली आहे. सोना मोहपात्राचा मोबाईल नंबर लीक झाला आहे. ज्यामुळे तिला नाहक त्रासाला सामोरं जावं लागत आहे. याविषयी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत तिने माहिती दिली आहे.
"कोणी तरी माझा पर्सनल मोबाईल नंबर वर्ल्ड वाईड वेबवर लीक केला आहे. तोच नंबर आता टेलीग्रामवरही व्हायरल झाला आहे. त्यामुळे गेल्या तीन दिवसांपासून मला सतत स्पॅम कॉल येत आहेत. साधारणपणे एका तासात मला १०० फोन आले आहेत. माझा नंबर कोणी लीक केला हे मला अजूनही कळलेलं नाही. पण, लवकरच मी शोधून काढेन. जेव्हा मला या फोन कॉलबद्दल कळेल त्यावेळी मी खरंच त्याच्यामागे बंदूक घेऊन धावेन", असं सोना मोहपात्राने तिच्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.
पुढे ती म्हणते, "तुमच्यापैकी जे मला सतत कॉल करुन त्रास देत आहेत त्यांनी सावध व्हा. मी तुमचे नंबर लिहून ठेवले आहेत. लवकरच मी ते सायबर सेल पोलिसांकडे देणार आहे."
दरम्यान, सोना मोहपात्राची ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर कमालीची व्हायरल होत आहे. सोनाने आजवर अनेक सुपरहिट सिनेमांना तिचा आवाज दिला आहे. बहारा, अंबरसरियाँ अशी कितीतरी गाजलेली गाणी तिने गायली आहेत.