'आता लाऊड स्पीकरचा त्रास होत नाही का?', ट्रोल करणाऱ्याला सोनू निगमचं सणसणीत उत्तर, म्हणाला..

By ऑनलाइन लोकमत | Published: January 24, 2024 09:36 AM2024-01-24T09:36:37+5:302024-01-24T09:37:31+5:30

Sonu nigam: सोनू निगमने दिलेल्या उत्तराची नेटकऱ्यांमध्ये चर्चा होत आहे.

bollywood-singer-sonu-nigam-reply-to-troll-over-using-loudspeaker-in-ram-mandir-pran-pratishtha-ceremon | 'आता लाऊड स्पीकरचा त्रास होत नाही का?', ट्रोल करणाऱ्याला सोनू निगमचं सणसणीत उत्तर, म्हणाला..

'आता लाऊड स्पीकरचा त्रास होत नाही का?', ट्रोल करणाऱ्याला सोनू निगमचं सणसणीत उत्तर, म्हणाला..

५ दशकांच्या मोठ्या संघर्षानंतर आयोध्येमध्ये प्रभू रामचंद्राचं मंदिर अखेर बांधण्यात आलं. २२ जानेवारी रोजी आयोध्येमध्ये प्रभू श्रीरामाच्या मुर्तीचा प्राणप्रतिष्ठा सोहळा संपन्न झाला. हा सोहळा संपूर्ण जगभरात गाजला. या सोहळ्यासाठी देशातील अनेक दिग्गज मंडळींना आमंत्रण पाठवण्यात आलं होतं. यात प्रसिद्ध गायक सोनू निगम (sonu nigam) याचाही समावेश होता.  या कार्यक्रमात सोनूने गाणंही सादर केलं. मात्र, त्याचा हा व्हिडीओ पाहिल्यानंतर एका युजरने त्याला ट्रोल केलं. इतकंच नाही तर त्याला मशिदीवरील लाऊड स्पीकरचं उदाहरण देत खोचक प्रश्नही विचारला. या प्रश्नाचं सोनूने सणसणीत उत्तर दिलं आहे.

सध्या सोशल मीडियावर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे अनेक फोटो, व्हिडीओ व्हायरल होत आहेत. यामध्येच सोनू निगमचा या कार्यक्रमातील गाण्याचा एक व्हिडीओ व्हायरल झाला. हा व्हिडीओ एका युजरने शेअर करत त्याला खोचक प्रश्न विचारला. मात्र, सोनूने सुद्धा त्याला त्याच्याच भाषेत उत्तर देत नेमका कसला त्रास होतो हे सांगितलं आहे.

काय होता युजरचा प्रश्न?

'मला सोनू निगमला एक प्रश्न विचारायचा आहे की, तुम्हाला तर लाऊडस्पीकच्या आवाजाचा त्रास होत होता, मग आज स्वत: लाऊड स्पीकरवर गात आहे', असा खोचक प्रश्न या युजरने विचारला.

सोनू निगमने दिलं सडेतोड उत्तर

"लाउड स्पीकरचा  काहीच त्रास नाही. त्रास तर सकाळी कोंबड्याप्रमाणे बांग देण्याचा आहे. सकाळी ४ वाजता होणाऱ्या आरडाओरड्याचा आहे. जर, तुमच्या पोटात दुखत असेल तर त्याचा उपाय मेडिकल सायन्समध्ये नाहीये. त्याचा उपाय अध्यात्म शास्त्रात आहे", असं उत्तर सोनूने दिलं.
 

Web Title: bollywood-singer-sonu-nigam-reply-to-troll-over-using-loudspeaker-in-ram-mandir-pran-pratishtha-ceremon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.