"AI ने केलेल्या चोरीचं समर्थन करणार नाही...", 'Ghibli' ट्रेंडवर प्रसिद्ध गायकाने व्यक्त केली नाराजी, म्हणाला...
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 2, 2025 15:15 IST2025-04-02T15:13:57+5:302025-04-02T15:15:03+5:30
सोशल मीडियावर गेल्या काही दिवसापासून फक्त Ghibli ट्रेंड चर्चेत आहे.

"AI ने केलेल्या चोरीचं समर्थन करणार नाही...", 'Ghibli' ट्रेंडवर प्रसिद्ध गायकाने व्यक्त केली नाराजी, म्हणाला...
Vishal Dadlani Post: सोशल मीडियावर गेल्या काही दिवसापासून फक्त Ghibli ट्रेंड चर्चेत आहे. बरेच लोक Ghibli स्टाईलमध्ये त्यांचे फोटो तयार करत आहेत. अनेकांनी या स्टाईलचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत. ओपनएआयच्या नवीन इमेज-जनरेशन अपडेटसह, वापरकर्ते स्टुडिओ घिबलीसारखे दिसणारे एआय क्रिएशन्स शेअर करत आहेत. राजकीय मंडळींपासून अनेक सेलिब्रिटींनी देखील आपले घिबली इमेजेस तयार करुन पोस्ट करताना पाहायला मिळत आहेत. असं असतानाही लोकप्रिय बॉलिवूड सिंगर विशाल ददलानीने या ट्रेंडला विरोध दर्शवला आहे. याबद्दल सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत गायकाने अनेकांचं लक्ष वेधलं आहे.
एआयने केलेल्या चोरीचं समर्थन आपण करणार नाही, असं म्हणत त्याने पोस्ट लिहिली आहे. "मला माफ करा. पण, घिबली स्टाईलचा वापर करून तुम्ही माझे जे फोटो बनवत आहात, ते मी पोस्ट करणार नाही. एका कलाकारानं आयुष्यभर केलेल्या कामाची चोरी एआयने केली आहे आणि मी त्याचं समर्थन करणार नाही."
त्यानंतर पुढे विशाल ददलानीने म्हटलंय, "यामुळे पर्यावरणाचं देखील मोठं नुकसान होतं. माझी सगळ्यांना विनंती आहे की, असे फोटो बनवणं बंद करा." असे शब्दांत पोस्ट लिहून गायकाने आपल्या मनातील भावना व्यक्त केल्या आहेत.
वर्कफ्रंट
विशाल ददलानीच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर विशाल-शेखर या जोडीने बॉलिवूड इंडस्ट्रीला अनेकसुपरहिट गाणी दिली आहेत. याशिवाय तो अनेक सिंगिंग रिॲलिटी शोमध्ये जज म्हणूनही दिसला आहे.