होऊ दे खर्च! WPL 2025 च्या ओपनिंग सोहळ्यात आयुषमान खुराणा आणणार रंगत!
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 13, 2025 16:56 IST2025-02-13T16:55:20+5:302025-02-13T16:56:37+5:30
आयुषमानचं खास गाणं आणि डान्स परफॉर्मन्स उद्घाटन सोहळ्याची रंगत वाढवेल.

होऊ दे खर्च! WPL 2025 च्या ओपनिंग सोहळ्यात आयुषमान खुराणा आणणार रंगत!
WPL 2025: बॉलिवूडचा तरुण सुपरस्टार आयुषमान खुराणाने (Ayushmann Khurrana ) पुन्हा एकदा सिद्ध केले आहे की तो इंडस्ट्रीतील सर्वात सुप्रसिद्ध कलाकारांपैकी एक आहे. वुमेन्स प्रीमियर लीग २०२५ च्या (Women’s Premier League 2025) उद्घाटन समारंभात आयुषमान खुराणा त्याच्या दमदार परफॉर्मन्स प्रेक्षकांना मोहित करणार आहे. आयुषमान खुराणा हा उत्तम अभिनेता असण्यासोबत एक जबरदस्त गायकदेखील आहे. २०२५ मधल्या या खास इव्हेंटमध्ये तो धमाकेदार परफॉर्मन्स तो प्रेक्षकांना आपलंसं करणार, यात शंका नाही.
आयुषमान खुराणा खुराना विमेन्स प्रीमियर लीग 2025 (WPL) च्या उद्घाटन सोहळ्यात धमाकेदार परफॉर्मन्ससाठी सज्ज झाला आहे. १४ फेब्रुवारी रोजी होणाऱ्या या सोहळ्यात परफॉर्म करणारा तो एकमेव सेलिब्रिटी असणार आहे. आयुषमानचं खास गाणं आणि डान्स परफॉर्मन्स उद्घाटन सोहळ्याची रंगत वाढवेल आणि WPL ची सुरूवात जोरदार होईल. या कार्यक्रमाला तो चार चाँद लावून जाणार आहे.
WPL ची सुरुवात गतविजेते रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू आणि गुजरात जायंट्स यांच्यातील पहिल्या सामन्याने होईल, जो शुक्रवारी म्हणजेच उद्या १४ फेब्रुवारी रोजी रंगणार आहे. १४ फेब्रुवारी ते १५ मार्च या कालावधीत ही स्पर्धा खेळवली जाणार आहे. वूमन्स प्रीमियर लीगचे सामने देशातील चार शहरांमध्ये खेळवले जातील, हे पहिल्यांदाच घडणार आहे. या स्पर्धेतील सर्वाधिक ८ सामने हे बंगळुरुच्या मैदानात रंगणार असून बडोदा ६, लखनऊच्या मैदानात ४ लढती रंगल्याचे पाहायला मिळेल. मुंबईच्या मैदानात प्लेऑफशिवाय साखळी फेरीतील प्रत्येकी २-२ सामने खेळवले जाणार आहेत.
वूमन्स प्रीमियर लीगमध्ये एकूण 5 संघ खेळतात, ज्यात गुजरात जायंट्स, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू, मुंबई इंडियन्स, दिल्ली कॅपिटल्स आणि यूपी वॉरियर्स यांचा समावेश आहे. WPL चा पहिला सामना पाहण्यासाठी वडोदऱ्यातील कोटाम्बी स्टेडियमवर प्रेक्षक उपस्थित राहणार आहेत. चाहते स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर टीव्हीवर वूमन्स प्रीमियर लीग २०२५ हंगामाच्या सामन्यांचे थेट प्रक्षेपण पाहू शकतात. सामन्यांचे ऑनलाइन स्ट्रीमिंग डिस्ने प्लस हॉटस्टार अॅपवर असेल.