अमानुषपणे गरोदर हत्तीणीची हत्त्या; बॉलिवूड संतापले!
By ऑनलाइन लोकमत | Published: June 4, 2020 11:28 AM2020-06-04T11:28:24+5:302020-06-04T11:30:18+5:30
केरळ राज्यात एका गरोदर हत्तीणीची स्फोटक भरलेले अननस देऊन हत्या करण्यात आली. या घटनेने पुन्हा एकदा मनुष्यातली माणुसकी मेलेली दिसली. यामुळे बॉलिवूडलाही दु:ख झाले आणि सदर घटना घडविणाऱ्यांविरुद्ध आपला रोष व्यक्त केला.
रवींद्र मोरे
केरळ राज्यात एका गरोदर हत्तीणीची स्फोटक भरलेले अननस देऊन हत्या करण्यात आली. ही हत्तीणी मल्लापुरम जिल्ह्यामध्ये शहराकडे येऊन गेली होती. याठिकाणी काही लोकांनी फळांच्या आत लपवून तिला फटाखे खाऊ घातले. घायाळ झाल्यानंतर ती तीन दिवसापर्यंत वेलियार नदीमध्ये उभी राहिली आणि तिच्यापर्यंत वैद्यकिय सुुविधा पोहचण्यात अपयशी ठरली. शेवटी तिचा करुण अंत झाला. या घटनेने पुन्हा एकदा मनुष्यातली माणुसकी मेलेली दिसली. यामुळे बॉलिवूडलाही दु:ख झाले आणि सदर घटना घडविणाऱ्यांविरुद्ध आपला रोष व्यक्त केला.
* अनुष्का शर्मा
अनुष्काने आपल्या इंस्टाग्राम स्टोरीवर या बातमीचा स्क्रीनशॉट शेअर करत लिहिले आहे की, हेच ते कारण आहे, ज्यासाठी आपल्याला पशु कु्ररतेविषयी कडक कायदा करण्याची आवश्यक आहे. आपल्या इंस्टाग्र्राम पोस्टसोबत तिने लिहिले आहे की, ‘आपण सर्वांनी केरळच्या मुख्यमंत्र्यांना निवेदन देऊ की, ‘लवकरच दोषींना शोधावे आणि त्यांना या घुणास्पद कृत्यासाठी कायद्यानुसार सजा देण्यात यावी.’
Maybe animals are less wild and humans less human. What happened with that #elephant is heartbreaking, inhumane and unacceptable! Strict action should be taken against the culprits. #AllLivesMatterpic.twitter.com/sOmUsL3Ayc
— Akshay Kumar (@akshaykumar) June 3, 2020
अक्षय कुमारने या घटनेबाबत दु:ख व्यक्त करत संतापून ट्विट केले आहे की, ‘मनुष्य आणि पशूंमध्ये जणू काही फरकच उरला नाही. मनुष्य हे पशूंपेक्षाही अमानुषपणे वागत आहेत. त्या हत्तीणीसोबत जे काही घडले ते खूपच मनाला चटका देणारे, अमानवीय आणि अस्वीकार्य आहे. दोषींच्या विरोधात कडक कार्यवाही व्हायलाच हवी.’
* रणदीप हुड्डा
रणदीप हुड्डाने केरळचे मुख्यमंत्री पिनाराई विजयन आणि प्र्रकाश जावडेकर यांना टॅग करत संबंधीत हत्तीणीचा फोटो शेअर करत लिहिले आहे की, एका गरोदर आणि फ्रेंडली हत्तीणीला काही लोकांनी मुद्दाम फटाकेयुक्त अननस खायला दिले, जे अतिशय अमानवीय आहे. हे पूर्णत: अस्वीकार्यही आहे. दोषींना कडक शासन व्हायलाच हवे.
* कार्तिक आर्यन
सदर घटनेबाबत कार्तिकनेही दु:ख व्यक्त करत संबंधीत लोेकांविरोधात रोष व्यक्त केला आहे. कार्तिकने हत्तीणीचा फोटो शेअर करत लिहिले आहे की, ‘खूपच निंदास्पद, हत्तीणीच्या आत्म्यास शांती मिळो.’
* आलिया भट्ट
आलिया भट्टलाही या घटनेचे दु:ख झाले असून तिने आपल्या इंस्टा स्टोरीमध्ये लिहिले आहे की, ‘भयानक, बस भयानक आहे. आम्हाला एकसोबत तिचा आवाज बनायला हवा. का आपल्याला कोणासोबत असा घृणास्पद मजाक करायला हवा? ही खूपच मनाला दु:ख देणारी बाब आहे.’
* टायगर श्रॉफ
टायगर श्रॉफने आपल्या इंस्टा स्टोरीवर गरोदर हत्तीणी आणि तिच्या बाळाचे कार्टून शेअर केले आहे. यात हत्तीणी सांगत आहे की, ‘मनुष्याने आपल्याला खायायला दिले, तर तिचे बाळ म्हणत आहे की, मनुष्य खूपच चांगले असतात.’