'हे' स्टार्स शूटिंगदरम्यानच्या अपघातातून बचावले बालंबाल!
By ऑनलाइन लोकमत | Published: February 22, 2020 11:31 AM2020-02-22T11:31:34+5:302020-02-22T11:36:17+5:30
यशस्वी स्टार्सना यशाचे फळे सहजासहजी चाखता आले नाहीत. त्यासाठी त्यांनी प्रचंड मेहनतीबरोबच मोठी जोखीमही पत्करली आहे. अर्थात शूटिंग दरम्यान काही स्टार्स जखमी झाले आहेत तर काही बेशुद्धही झाले आहेत. जाणून घेऊया त्या स्टार्सबद्दल...
-रवींद्र मोरे
अलीकडे कमल हासनच्या ‘इंडियन 2’ चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान मोठा अपघात घडला, त्यात सहाय्यक दिग्दर्शकासह तीन जण मृत्यू पावले. चित्रपटात काम करण्याचं जरी प्रत्येकाला आकर्षण वाटत असलं तरी हे काम पाहिजे तसे सोपे नव्हे. मेहनतीबरोबरच याठिकाणी खूप मोठी जोखीमदेखील असते. यशस्वी स्टार्सना यशाचे फळे सहजासहजी चाखता आले नाहीत. त्यासाठी त्यांनी प्रचंड मेहनतीबरोबच मोठी जोखीमही पत्करली आहे. अर्थात शूटिंग दरम्यान काही स्टार्स जखमी झाले आहेत तर काही बेशुद्धही झाले आहेत. जाणून घेऊया त्या स्टार्सबद्दल...
* अक्षय कुमार
मार्शल आर्ट तज्ज्ञ ते बॉलिवूड खिलाडीपर्यंतचा अक्षयचा प्रवास खूपच इंटरेस्टिंग आहे. अक्षयचे बऱ्याच चित्रपटात स्टंट बघावयास मिळाले आहेत. विशेष म्हणजे त्याला स्वत:चे सर्व स्टंट स्वत: च करायला आवडतात. एकदा राउडी राठौड चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान मात्र अक्षय जखमी झाला होता, मात्र तरीही त्याने शूटिंग थांबविले नव्हते.
* शाहरुख खान
प्रचंड मेहनतीने शाहरुखने बॉलिवूडमध्ये किंगची पदवी मिळविली आहे. बºयाच चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान तो जखमीही झाला आहे. चेन्नई एक्सप्रेस आणि माय नेम इज खान या चित्रपटांच्या शूटिंगनंतर त्याला खांद्यावर शस्त्रक्रि या करावी लागली होती. कोयला चित्रपटाच्यावेळी तर धोकादायक अपघात घडला होता. यावेळी सुदैैवाने तो वाचला होता.
* सलमान खान
बॉलिवूडचा दबंग अर्थात सलमान खानदेखील खतरनाक स्टंट करत असतो. वांटेड या सुपरहिट चित्रपटाच्या वेळी अॅक्शन सीन करताना सलमान जखमी झाला होता. त्याला त्यावेळी थेट रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. काही दिवसांसाठी शूटिंग थांबवावी लागली होती.
* ऋतिक रोशन
बॉलिवूडमध्ये ऋतिककडे एक अॅक्शन हिरो म्हणून बघितले जाते. ऋतिकलाही स्वत:चे स्टंट स्वत:च करायला आवडतात. अशातच तो बँग बँग आणि मोहेंजोदारो या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये जखमी झाला होता
* प्रियांका चोप्रा
बॉलिवूड ते हॉलिवूड अशी उत्तुंग भरारी घेतलेली प्रियांका आज ग्लोबल स्टार म्हणून ओळखली जाते. ती देखील बºयाच अॅक्शन चित्रपटात दिसली असून बाजीराव मस्तानी चित्रपटाच्या शूटिंगच्या वेळी ती बेशुद्ध पडली होती. कामाच्या जास्त दाबामुळे ती सुमारे सहा तास बेशुद्ध होती, असे सूत्रांनी सांगितले होते.
* ऐश्वर्या राय
आपल्या सौंदर्याने तरुणाईला घायाळ करणारी ऐश्वर्या राय बच्चन खाकी चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान जखमी झाली होती. ऐश्वर्या कारमध्ये बसली होती आणि तिच्या ड्रायव्हरचे कारवरील नियंत्रण गमावले होते. या घटनेत ऐश्वर्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
* जॉन अब्राहम
जॉन अब्राहम देखील बॉलिवूडमध्ये अॅक्शन हिरो म्हणून ओळखला जातो. फोर्स 2 चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान स्टंट करताना जॉनच्या गुडघ्याला दुखापत झाली होती. त्यावेळी जॉनच्या गुडघ्याचे आॅपरेशन करावे लागले होते.