#AskSRK : “मला काढून टाकावं…”, चाहत्याने निवृत्तीबद्दल छेडलं, शाहरूखने दिलं कडक उत्तर
By ऑनलाइन लोकमत | Published: February 20, 2023 03:50 PM2023-02-20T15:50:44+5:302023-02-20T15:53:34+5:30
#AskSRK, Shah Rukh Khan : नेहमीप्रमाणे चाहत्यांनी शाहरूखला मनातले प्रश्न विचारले आणि शाहरूखने अगदी मनापासून चाहत्यांच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर दिलं.
शाहरूख खानचं (Shah Rukh Khan) म्हणजे, ‘किंग ऑफ रोमान्स’. किंगखान, बादशाह नावानंही तो ओळखला जातो. ‘झिरो’ या चित्रपटानंतर शाहरूख खान जणू मोठ्या पडद्यावरून गायब झाला होता. शाहरूखचं स्टारडम आता संपलं, असं या काळात बोललं गेलं. पण चार वर्षानंतर किंगखान शाहरूखनं असं काही कमबॅक केलं की, सगळेच थक्क झालेत. चार वर्षानंतर आलेला त्याच्या ‘पठाण’ (Pathaan) या सिनेमानं छप्परफाड कमाई केली. जगभर या सिनेमानं १००० कोटींचा गल्ला जमवला. भारतात या सिनेमानं ५०० कोटी कमावले. सध्या किंगखान ‘पठाण’चं यश सेलिब्रेट करतोय. याचदरम्यान आज त्याने ‘आस्क SRK’ सेशन घेतलं. नेहमीप्रमाणे चाहत्यांनी शाहरूखला मनातले प्रश्न विचारले आणि शाहरूखने अगदी मनापासून चाहत्यांच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर दिलं. यातला एक प्रश्न होता शाहरूखच्या निवृत्तीसंदर्भातला.“तू निवृत्ती घेतल्यानंतर सिनेसृष्टीतील सर्वात मोठी गोष्ट कोणती असेल?” असा प्रश्न एका चाहत्याने शाहरूखला विचारला. यावर शाहरूखने काय उत्तर दिलं माहितेय?
I will never retire from acting…I will have to be fired…and maybe even then I will come back hotter!! https://t.co/YHSQZ3ndub
— Shah Rukh Khan (@iamsrk) February 20, 2023
“मी अभिनयातून कधीच निवृत्त होणार नाही. त्यासाठी मला काढून टाकावं लागेल आणि असं झालंच तरी मी आणखी नव्या दमानं परतेन”, असं शाहरुख खान यावर म्हणाला.
I explain the same thing too many times..I explain the same thing too many times…I explain the same thing too many times!!! https://t.co/x3ZSnEYMIj
— Shah Rukh Khan (@iamsrk) February 20, 2023
तुझी सगळ्यात वाईट सवय कोणती असा आशयाचा प्रश्न एका चाहत्याने केला. यावर मी एकच गोष्ट वारंवार समजावतो, असं शाहरूखने सांगितलं.
शाहरूखच्या ‘पठाण’ या चित्रपटाबद्दल सांगायचं झाल्यास २६ दिवसानंतरही हा सिनेमा गर्दी खेचतोय. काल रविवारी ‘पठाण’ पुन्हा एकदा ब्लॉकबस्टर रेकॉर्ड केला आहे. शनिवारी बॉक्स ऑफिसवर शानदार कामगिरी केल्यानंतर, चित्रपटाने चौथ्या रविवारी म्हणजेच २६व्या दिवशी ४.५० कोटींची कमाई केली. पठाण हा चित्रपट २५ जानेवारी रोजी बॉक्स ऑफिसवर प्रदर्शित झाला होता. हिंदीसह तमिळ, तेलुगू भाषेमध्ये हा सिनेमा प्रदर्शित करण्यात आला. कमाईच्या बाबतीत या चित्रपटाने ‘केजीएफ’ आणि ‘बाहुबली’, ‘वॉर’सारख्या चित्रपटांनाही मागे टाकलं आहे.