एकही हीट चित्रपट नाही, करिअर फ्लॉप; तरीही बक्कळ संपत्तीची मालकीण आहे रिया चक्रवर्ती
By ऑनलाइन लोकमत | Published: July 1, 2024 03:29 PM2024-07-01T15:29:11+5:302024-07-01T15:30:08+5:30
आज रिया ही 32 वा वाढदिवस साजरा करत आहे.
बॉलिवूडमध्ये अशा अनेक अभिनेत्री आहेत, ज्यांनी अनेक सिनेमांमध्ये काम केलं पण त्यांचं करिअर काही चालू शकलं नाही. अशाच अभिनेत्रींपैकी एक म्हणजे रिया चक्रवर्ती (rhea chakraborty). बॉलिवूडमध्ये रियाची गाडी फार चालली नाही. बॉलिवूडमधील करिअर फ्लॉप असलं तरीही रिया ही करोडो रुपयांची मालकीण आहे. आज रिया ही 32 वा वाढदिवस साजरा करत आहे. तर यानिमित्ताने आपण रिया चक्रवर्तीची एकूण संपत्ती आणि कमाई याबद्दल जाणून घेणार आहोत.
रियाचा जन्म 1 जुलै 1992 रोजी कर्नाटकातील बंगळुरुमध्ये येथे झाला. बॉलिवूडमध्ये येण्यापूर्वी रिया एमटीव्ही इंडियावर व्हीजे म्हणून काम करत होती. यानंतर अभिनयाच्या आवडीमुळे ती चित्रपटकडे वळली आणि अनेक बॉलिवूड आणि तेलुगु चित्रपटांमध्ये काम केलं.
३२ वर्षीय रियाने 'मेरे डॅड की मारुती' या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. 2013 मध्ये रिलीज झालेला हा चित्रपट फ्लॉप ठरला. याशिवाय रियाने 'जलेबी', 'हाफ गर्लफ्रेंड', 'बँक चोर' आणि 'सोनाली केबल' यांसारख्या चित्रपटांमध्ये काम केलं. मात्र, तिचा एकही चित्रपट विशेष कामगिरी काही करू शकला नाही.
जरी रियाच्या चित्रपटांनी यशाची चव चाख
ली नसली आणि बॉक्स ऑफिसवर अपयशी ठरले असले तरी ती कोट्यावधी संपत्तीची मालकीने आहे. चित्रपट फ्लॉप होऊनही रिया लक्झरी लाइफ जगते. ब्रँड एंडोर्समेंट आणि स्टेज शो यातून ती मोठी कमाई करते. जनसत्ताच्या रिपोर्ट्सनुसार, रिया दरमहा अडीच लाख रुपये कमावते. तिचे वार्षिक उत्पन्न सुमारे 30 लाख रुपये आहे. रिया एका चित्रपटासाठी 30 लाख रुपये मानधन घेते. सध्या त्यांची एकूण संपत्ती 11 कोटी एवढी आहे.
रिया चक्रवर्ती मुंबईतील एका पॉश भागात राहते. तिच्या आलिशान अपार्टमेंटची किंमत सुमारे 85 लाख रुपये आहे. रियाकडे टोयोटा इनोव्हा कार आहे ज्याची किंमत सुमारे 20 लाख आहे. याशिवाय, एक जीप कंपास एसयूव्ही देखील आहे, ज्याची किंमत सुमारे 23 लाख रुपये आहे.
दिवंगत बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत (sushant singh rajput) याच्या आत्महत्येनंतर रिया चक्रवर्ती सर्वाधिक चर्चेत राहिली होती. सुशांतच्या आत्महत्या प्रकरणात रिया चांगलीच अडकली होती. सुशांतच्या मृत्यूनंतर रियावर अनेक आरोप झाले. परिणामी, तिला तुरुंगातही जावं लागलं. मात्र, काही आठवड्यांनंतर तिला जामीन मिळाला. यानंतर काही काळ रिया ही बॉलिवूड आणि मीडियापासून दूर राहिली होती.