सुजलेले ओठ अन् फुगलेले गाल; 'टारझन' फेम अभिनेत्रीचा नवा लूक पाहून नेटकरी हैराण 

By ऑनलाइन लोकमत | Published: August 22, 2024 01:59 PM2024-08-22T13:59:37+5:302024-08-22T14:01:21+5:30

अभिनेत्री आयशा टाकियाने 'टारझन' या चित्रपटातून सिनेइंडस्ट्रीत पाऊल ठेवलं.

bollywood tarzan fame actress ayesha takia new look photo viral netizens trolled | सुजलेले ओठ अन् फुगलेले गाल; 'टारझन' फेम अभिनेत्रीचा नवा लूक पाहून नेटकरी हैराण 

सुजलेले ओठ अन् फुगलेले गाल; 'टारझन' फेम अभिनेत्रीचा नवा लूक पाहून नेटकरी हैराण 

Ayesha Takia Transformation : अभिनेत्री आयशा टाकियाने 'टारझन' या चित्रपटातून सिनेइंडस्ट्रीत पाऊल ठेवलं. एकेळाळी बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेत्रींच्या यादीत आयशा टाकिया अव्वल स्थानावर होती. वेगवेगळ्या हिंदी चित्रपटांसह दक्षिणात्य सिनेसृष्टीतही तिने आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला. अभिनेता सलमान खानसोबत 'वॉन्टेड' सिनेमात तिने केलेल्या कामाचं सर्वत्र कौतुक झालं. आपल्या सहज सुंदर अभिनयाने तसेच सौंदर्याने आयशाने चाहत्यांना आपलंस केलं. शिवाय या चित्रपटामुळे तिच्या लोकप्रियतेत कमालीची वाढ झाली. पण सध्या अभिनेत्री एका वेगळ्याच कारणामुळे लाईमलाइटमध्ये आली आहे. याचं कारण सोशल मीडियावर आयशाचा व्हायरल होणारा फोटो आहे.


अभिनेत्री आयशा टाकियाने सिने इंडस्ट्रीपासून चार हात लांब राहणं पसंत केलंय. असं असलं तरी ती सोशल मीडियाच्या माध्यमातून ती चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करते. त्याद्ववारे आपल्या वैयक्तिक आयुष्यातील अपडेट्स ती देत असते. नुकताच अभिनेत्रीने सोशल मीडियावर शेअर केलेला तिचा एक फोटो पाहून चाहते हैराण झाले आहेत. 'वॉन्टेड गर्ल' आयशाचं हे ट्रान्सफॉर्मेशन पाहून नेटकऱ्यांकडून तिला प्रचंड ट्रोल करण्यात आलं आहे.  

आयशाने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर निळ्या रंगाची साडी परिधान करून एक फोटो पोस्ट केला आहे. मोकळे केस, पिंक टोन मेकअप असा लूक तिने केला आहे. त्यामुळे आयशा ओळखूच येत नाही आहे. 

नेटकऱ्यांनी केलं ट्रोल-

आयशाचा असा बदललेला लूक पाहून नेटकऱ्यांनी तिला प्रचंड ट्रोल केलं आहे. एका सोशल मीडिया यूजरने अभिनेत्रीच्या फोटोंवर कमेंट करत लिहलंय," तु तुझा चेहरा आणि नैसर्गिक सौंदर्य का खराब करते आहेस". तर आणखी एकाने कमेंट करत आपली प्रतिक्रिया दिली आहे त्यामध्ये तो म्हणाला, "एकेकाळी तू बॉलिवूडची क्वीन होतीस".

आयशा टाकियाने बॉलिवूडमधील खूप चांगल्या चित्रपटांमध्ये काम केलं आहे. 'वॉन्टेड', 'दिल मांगे मोर', 'शादी नंबर १','कॅश', 'पाठशाला','दे ताली' अशा अनेक चित्रपटांत ती झळकली आहे. 

Web Title: bollywood tarzan fame actress ayesha takia new look photo viral netizens trolled

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.