बॉलिवूडचे थरारक चित्रपट

By ऑनलाइन लोकमत | Published: November 24, 2016 09:09 PM2016-11-24T21:09:06+5:302016-11-24T21:09:06+5:30

बॉलिवूड म्हणजे मसाला, मनोरंजन. लोकांना काय हवे ते पाहून चित्रपट काढण्याची इथली पद्धती. तरीही काही जण बेफिक्रे पद्धतीने चित्रपट ...

Bollywood thrilling movie | बॉलिवूडचे थरारक चित्रपट

बॉलिवूडचे थरारक चित्रपट

googlenewsNext
लिवूड म्हणजे मसाला, मनोरंजन. लोकांना काय हवे ते पाहून चित्रपट काढण्याची इथली पद्धती. तरीही काही जण बेफिक्रे पद्धतीने चित्रपट काढतात. अशांमध्ये हॉरर चित्रपटांचा समावेश होतो. एकेकाळी रामसे बंधू म्हणजे थरारक चित्रपट असे समीकरण होते. असे चित्रपट बॉक्स आॅफिसवर चालतात, कधीकधी ते हिटही होतात. कमी पैशात चांगला नफा मिळवून देणारे चित्रपट म्हणून याकडे पाहिले जाते. २०१६ मध्ये अशाच थरारक बॉलिवूड चित्रपटाची माहिती या ठिकाणी देत आहोत.
कॉलिंग बेल



कॉलिंग बेल हा असाच थरारक चित्रपट. अर्थात हा चित्रपट कधी आला आणि फ्लॉप झाला हे कळाले देखील नाही. यावर्षीच्या अशाच थरारक चित्रपटांमध्ये याचा समावेश झाला, हेच या चित्रपटाचे वैशिष्ट्य
मल्लिका एच. डी.



समीर दत्तानी, हिमांशू मलिक, सुरेश मेनन, शीना नायर यांचा हा चित्रपट बॉक्स आॅफिसवर फार काही कमाल दाखवू शकला नाही. विल्सन लुईस या निर्माता, दिग्दर्शकाने हा चित्रपट काढला होता.
रिटर्न आॅफ कालो



राहुल यांच्या दिग्दर्शनात तयार झालेला कालो हा चित्रपट जितनचा सिक्वल होता. जितन रमेश आणि सृष्टी डांगे यांच्या प्रमुख भूमिका होत्या. हा चित्रपट फारसे काही करु शकला नाही.
मंजुलिका रिटर्न्स


मनोज नंदन, अनिल कल्याण असे अनोळखी कलाकार असणाºया मंजुलिका रिटर्न्स हा चित्रपट बॉक्स आॅफिसवर साफ आपटला. भानू प्रकाश बालुसू या दिग्दर्शकाने याचे दिग्दर्शन केले होते.
रहस्य



हॉरर चित्रपटामधील आणखी एक चित्रपट. ज्याने यावर्षी बॉक्स आॅफिसवर फारशी कमाल दाखविली नाही. 



Web Title: Bollywood thrilling movie

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.