Throwback: फोटोतील हा चिमुकला आज आहे सुपरस्टार; कधीकाळी त्याला सेटवरून हाकलून लावलं होतं...!
By ऑनलाइन लोकमत | Published: February 9, 2022 11:24 AM2022-02-09T11:24:45+5:302022-02-09T11:26:11+5:30
Bollywood Throwback: होय, फोटोतील एक चेहरा आजच्या एका सुपरस्टारचा आहे. फोटोतील हा चिमुकला आज खूप मोठा स्टार बनला आहे. ओळखा पाहू कोण?
बॉलिवूड स्टार्सचे थ्रोबॅक फोटो पाहून चाहते हुरळून जातात. म्हणूनच सोशल मीडियावर बॉलिवूड स्टार्सचे रोज नवे थ्रो बॅक फोटो व्हायरल होताना दिसतात. सध्या एक असाच फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय. होय, फोटोतील एक चेहरा आजच्या एका सुपरस्टारचा आहे. फोटोतील हा चिमुकला आज खूप मोठा स्टार बनला आहे. त्याची एक झलक पाहण्यासाठी चाहते आतूर असतात. तुम्ही अद्यापही त्याला ओळखू शकले नसाल तर आम्ही सांगतो.
फोटोतील हा चिमुकला दुसरा तिसरा कुणी नसून चाहत्यांचा आवडता स्टार रणवीर सिंग (Ranveer Singh) आहे. आता त्याच्याबद्दल तुम्हाला वेगळं काही सांगायची गरज नाही. आज फक्त त्याच्या नावावर सिनेमे चालतात. रणवीर बालपणापासून अक्षय कुमारचा फॅन आहे. होय, अगदी लहानपणापासून. लहान असताना एकदा अक्षयला भेटायचंच, असं म्हणून रणवीर इतका जिद्दीला पेटला होता की, त्याचे वडील त्याला अक्षयच्या ‘मोहरा’चं (Mohra)शूटींग दाखवायला घेऊन गेले होते. पण या चित्रपटाच्या सेटवरून रवीनाने चिमुकल्या रणवीरला हुसकावूल लावलं होतं. काय होता तो किस्सा, ते सुद्धा आज आम्ही इथे सांगणार आहोत.
काय होता तो किस्सा
हा किस्सा आहे 1994 सालचा. रवीना टंडन त्यावेळी ‘मोहरा’ या चित्रपटातील ‘टीप टीप बरसा पानी’ या गाण्याचे शूटींग करत होती. रणवीर या गाण्याच्या सेटवर हजर होता. पण त्यावेळी रणवीर केवळ 11 वर्षांचा होता. रणवीरला सेटवर पाहून रवीनाला काहीसं अवघडल्यासारखं वाटू लागलं. त्यामुळे तिने लगेच निर्मात्यांना सांगून रणवीरला सेटवरून बाहेर काढलं.
रवीनाने असं का केलं, याचा खुलासाही नंतर झाला होता. रवीनाने स्वत: याबद्दल सांगितलं होतं. ‘होय, मी रणवीरला सेटवरून हाकललं होतं. कारण त्यावेळी ‘टीप टीप बरसा पानी’ (Tip Tip Barsa Pani) गाण्याचं शूटींग सुरु होतं आणि हे गाणं प्रचंड सेन्शुअल होतं. रणवीर तेव्हा खूप लहान होता. मुलांनी असं सेन्शुअल गाणं शूट होताना पाहू नये, असं माझं मत होतं. त्यामुळे आईवडिलांना राहू द्या, पण लहान मुलांना बाहेर काढा, असे मी निर्मात्यांना सांगितलं होतं. मुलांनी वयाच्या हिशेबाने योग्य तेच पहावं, हे माझं मत आहे आणि आत्ताही मी या मतावर ठाम आहे,’ असे रवीना म्हणाली होती.
रवीना तिच्या जागी अगदी योग्य होती. पण रणवीर आजही रवीनाला भेटला की, या घटनेचा न चुकता उल्लेख करतो. अर्थात गमतीने.