'स्त्री २'ला टक्कर द्यायला 'तुंबाड' पुन्हा होतोय रिलीज! या तारखेपासून तुमच्या जवळच्या सिनेमागृहात
By ऑनलाइन लोकमत | Published: August 27, 2024 04:40 PM2024-08-27T16:40:28+5:302024-08-27T16:41:25+5:30
सध्या गाजत असलेल्या 'स्त्री २'ला टक्कर द्यायला तुंबाड गाजलेला भयपट पुन्हा होतोय रिलीज. तारीख लिहून ठेवा
सध्या सगळीकडे 'स्त्री २' सिनेमा चांगलाच गाजतोय. या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केलीय. राजकुमार राव, श्रद्धा कपूर, अभिषेक बॅनर्जी, अपारशक्ती खुराना या सगळ्यांच्या केमिस्ट्रीचं चांगलंच कौतुक होतंय. 'स्त्री २' पाहून अनेकांची थिएटरमध्ये घाबरगुंडी उडालेली दिसतेय. याच 'स्त्री २' ला टक्कर द्यायला बॉलिवूडमध्ये गाजलेला सिनेमा पुन्हा रिलीज होणार आहे. हा सिनेमा म्हणजे 'तुंबाड'. राही अनिल बर्वे दिग्दर्शित 'तुंबाड' सिनेमा पुन्हा रिलीज होणार असल्याने सर्वांना आनंद झाला आहे.
या तारखेपासून 'तुंबाड' जवळच्या सिनेमागृहात
२०१८ मध्ये रिलीज झालेला 'तुंबाड' सिनेमा ३० ऑगस्टपासून पुन्हा एकदा नजीकच्या सिनेमागृहात रिलीज होणार आहे. येत्या शुक्रवारी हा सिनेमा भारतातील काही थिएटरमध्ये पुन्हा रिलीज करण्यात येणार आहे. सोहम शाह निर्मित आणि राही अनिल बर्वे दिग्दर्शित 'तुंबाड' पाहून थिएटरमध्ये अनेकांच्या काळजाचा थरकाप उडाला. हाच अनुभव पुन्हा घेण्यासाठी प्रेक्षक ३० ऑगस्टला थिएटरमध्ये गर्दी करतील यात शंका नाही.
Tumbbad is re-releasing in theatres on August 30. pic.twitter.com/udcUV5ME1S
— Films and Stuffs (@filmsandstuffs) August 24, 2024
#Stree2 Official Worldwide Gross: ₹ 589cr (12 Days)
— 𝗠𝗼𝗻𝗸𝗲𝘆 (@Animalofficiall) August 27, 2024
All Credit Goes to #ShraddhaKapoor & #TamannaahBhatia#TheGreatestOfAllTime#Devara#SaripodhaaSanivaaram#Aashiyana#KanganaRanaut#Janmashtamipic.twitter.com/i3UHki8PYlpic.twitter.com/kghRND5l7D
'तुंबाड'मुळे स्त्री २ वर होणार परिणाम?
राही अनिल बर्वेच्या 'तुंबाड' मुळे 'स्त्री २' च्या कमाईवर परिणाम होईल अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. 'तुंबाड' हा सिनेमा थिएटरमध्ये अनुभवण्यासारखा सिनेमा आहे. या सिनेमाला आजही एक मास्टरपीस म्हणून ओळखलं जातं. याशिवाय ३० ऑगस्टला कोणताही नवीन बॉलिवूड सिनेमा रिलीज होत नसल्याने 'तुंबाड' पाहायला दर्दी प्रेक्षक थिएटरमध्ये जातील यात शंका नाही. यामुळे सध्या कमाईचा पाऊस पाडणाऱ्या 'स्त्री २' च्या कमाईवर थोडाफार परिणाम होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.