आहारात फक्त 'हे' पदार्थ! ७३ वर्षांच्या झीनत अमान यांच्या सौंदर्य आणि फिटनेसचं रहस्य जाणून घ्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 18, 2025 13:49 IST2025-02-18T13:48:25+5:302025-02-18T13:49:08+5:30
वय वर्ष ७३ असूनही झीनत अमान इतक्या फिट अँड फाइन कशा? जाणून घ्या (zeenat aman)

आहारात फक्त 'हे' पदार्थ! ७३ वर्षांच्या झीनत अमान यांच्या सौंदर्य आणि फिटनेसचं रहस्य जाणून घ्या
बॉलिवूडमधील ज्येष्ठ अन् श्रेष्ठ अशी ओळख असलेल्या अभिनेत्री म्हणजे झीनत अमान. (zeenat aman) झीनत अमान या ७३ वर्षांच्या आहेत. सध्या झीनत सिनेमात अभिनय करत नसल्या तरीही त्या सोशल मीडियावर आजकालच्या तरुण पिढीप्रमाणे चांगल्याच सक्रीय आहेत. झीनत अमान ७३ वर्षांच्या असल्या तरीही चेहऱ्यावरील ग्लो कमी झाला नाहीये. सौंदर्यात त्या अजूनही अभिनेत्रींना टक्कर देत आहेत. स्वतःचं सौंदर्य आणि फिटनेस जपण्यासाठी झीनत त्यांच्या आहारात कोणत्या पदार्थांचा समावेश करतात, जाणून घ्या.
झीनत अमान यांचा दैनंदिन आहार:
- सकाळी उठल्यावर: झीनत अमान यांच्या दिवसाची सुरुवातत ब्लॅक टीने होते. त्यानंतर त्या वाटीत भिजवलेले बदाम खातात. ज्यामुळे पचनक्रियेला चालना मिळते. पुढे नाश्त्यामध्ये त्या स्मॅश बटाटे आणि शेडर चीज (Cheddar cheese) लावलेलं टोस्ट खातात. कधी भारतीय देशी पदार्थ खायची इच्छा असेल तर त्या पोहे किंवा चीला यांचा आहार घेतात.
- दुपारी जेवताना: झीनत अमान या दुपारी पोटभर जेवायला प्राधान्य देतात. परंतु साधा आहार त्या घेतात. दुपारी झीनत अमान या डाळ, भाजी आणि चपाती यांचा आहार घेतात. क्वचित आंबटगोड डाळ, मसालेयुक्त बटाटे-वाटाण्याची भाजी, पनीर टिक्का याशिवाय घरी बनवलेली टोमॅटोची चटणी खाणं पसंत करतात.
- संध्याकाळी: दुपारी जेवल्यानंतर संध्याकाळी ५ वाजता झीनत अमान या भाजलेले मखाना खाण्यास प्राधान्य देतात. त्यावर थोडंसं मीठ आणि मसाला त्या पेरतात. चीज आणि साखरयुक्त पदार्थ खाणं त्या टाळतात.
अशाप्रकारे तुम्हालाही झीनत अमान यांच्यासारखं फिट अँड फाईन राहायचं असेल तर तुम्हालाही तुमचा आहार साधा अन् पौष्टिक आहार घेणं गरजेचं आगे. झीनत अमान यांनी बॉलिवूडचा एक काळ गाजवलाय. लवकरच त्यांचा 'बन टिक्की' हा हिंदी सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.