'सबका दिल जितेगी रे मेरी बेटी...','नवाजुद्दीन सिद्दीकी'ची लेक दिसते लाखात एक!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 12, 2024 17:36 IST2024-12-12T17:33:07+5:302024-12-12T17:36:09+5:30

Nawazuddin Siddiqui : आलिया कश्यपच्या लग्नात सर्वांचं लक्ष वेधून घेणारी मुलगी म्हणजे बॉलिवूडचा सुपरहिट खलनायक नवाजुद्दीन सिद्दीकी याची लेक शोरा सिद्दीकी आहे.

bollywood villain Nawazuddin Siddiqui 15 years old daughter shora age glamorous look | 'सबका दिल जितेगी रे मेरी बेटी...','नवाजुद्दीन सिद्दीकी'ची लेक दिसते लाखात एक!

'सबका दिल जितेगी रे मेरी बेटी...','नवाजुद्दीन सिद्दीकी'ची लेक दिसते लाखात एक!

अनुराग कश्यपची मुलगी आलिया कश्यप हिचं लग्न मोठ्या थाटामाटात पार पडलं. हे लग्न आणि रिसेप्शनसाठी अनेक मोठमोठ्या सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती. आलियाचे सर्व मित्र-मैत्रिणी आणि स्टार किड्सही पोहोचले होतो. याच दरम्यान एका १५ वर्षांच्या सुंदर मुलीने सर्वांचंच लक्ष वेधून घेतलं. तिचा सिंपल लूक सर्वांनाच भावला आणि सर्वांनीच तिचं कौतुक केलं आहे. 

आलिया कश्यपच्या लग्नात सर्वांचं लक्ष वेधून घेणारी मुलगी म्हणजे बॉलिवूडचा सुपरहिट खलनायक नवाजुद्दीन सिद्दीकी याची लेक शोरा सिद्दीकी आहे. शोरा आपल्या वडिलांसोबत आलिया कश्यपच्या लग्नात आली होती. यावेळी दोघांनी एकत्र पोज दिली आणि फोटो काढले. हे फोटो सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत असून त्याची तुफान चर्चा रंगली आहे. 

नवाजुद्दीन सिद्दीकीच्या मुलीचा लूक सर्वांनाच आवडला. तिने पिस्ता रंगाचा छान ड्रेस परिधान केला होता. तिचं गोड हसणं, निरागस चेहरा आणि आत्मविश्वासाने तिने चाहत्यांची मनं जिंकली. काहींनी ती नक्कीच अभिनेत्री बनेल असं थेट म्हटलं. तर काहींनी तिच्या लूकची तुलना सोनाक्षीशी केली. शोरा सोनाक्षीसारखी दिसत असल्याचं म्हटलं आहे. 

अभिनेत्याला एक मुलगा आणि एक मुलगी अशी दोन मुलं आहेत. मुलीचं नाव शोरा असून ती १५ वर्षांची आहे. डिसेंबरमध्येच तिचा वाढदिवस आहे. शोराच्या आईचं नाव आलिया सिद्दीकी आहे. ती सध्या तिच्या आईसोबत राहते आणि तिचं शिक्षण पूर्ण करत आहे. 

Web Title: bollywood villain Nawazuddin Siddiqui 15 years old daughter shora age glamorous look

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.