बॉलिवूडच्या ‘या’ कलाकारांचे आयुष्य प्रेरणादायी!

By अबोली कुलकर्णी | Published: December 12, 2018 11:45 AM2018-12-12T11:45:35+5:302018-12-12T11:46:16+5:30

प्रत्येक क्षेत्रात असे अनेक व्यक्ती असतात ज्यांचा आदर्श जर आपण डोळयांसमोर ठेवला तर नक्कीच आपण आपलेही काम इतरांसाठी प्रेरणादायी घडवू शकतो. आता हेच पाहा ना, बॉलिवूड इंडस्ट्रीतील कलाकार हे किती कठोर मेहनत घेतात?

Bollywood's 'The Artists' Life Inspirational! | बॉलिवूडच्या ‘या’ कलाकारांचे आयुष्य प्रेरणादायी!

बॉलिवूडच्या ‘या’ कलाकारांचे आयुष्य प्रेरणादायी!

googlenewsNext

अबोली कुलकर्णी 

कष्ट केल्याशिवाय यश मिळत नाही. कामातील सातत्य आणि मेहनत घेतली तरच कुठलाही व्यक्ती इच्छित ध्येय गाठू शकते. जर तुम्ही मेहनत करत नाही, तर तुमचा विकास होणार नाही. प्रत्येक क्षेत्रात असे अनेक व्यक्ती असतात ज्यांचा आदर्श जर आपण डोळयांसमोर ठेवला तर नक्कीच आपण आपलेही काम इतरांसाठी प्रेरणादायी घडवू शकतो. आता हेच पाहा ना, बॉलिवूड इंडस्ट्रीतील कलाकार हे किती कठोर मेहनत घेतात? मात्र काही सेलिब्रिटींचेच आयुष्य हे प्रचंड प्रेरणादायी ठरते. चला तर मग पाहूयात कोण आहेत हे सेलिब्रिटी जे इतरांसाठी प्रेरणादायी ठरू शकतात.

* बोमण इराणी :
 हे एक खूप उत्कृष्ट कलाकार आहेत. पण, तुम्हाला माहितीये का ते अभिनय क्षेत्रात येण्यापूर्वी कोण होते? ते मुंबईच्या ताज महल पॅलेस हॉटेल येथे वेटरचे तसेच रूम सर्व्हिस म्हणून देखील काम करायचे. नंतर त्यांनी त्यांच्या आईचे जुने बेकरी शॉप जाईन केले. त्यांनी २००३ च्या मुन्नाभाई एमबीबीएस या कॉमेडी चित्रपटात सर्वांचे लक्ष वेधून घेतले. आणि मग त्यांच्या करिअरची गाडी जी सुसाट सुटली तिला आजपर्यंत त्यांनी ब्रेक लावला नाही.

* अक्षयकुमार :
बॉलिवूडचा खिलाडी म्हणून आज आपण अक्षयकुमार याला ओळखतो. मात्र, बॉलिवूडमध्ये करिअर सुरू करण्यापूर्वी अक्की बँकॉकच्या एका रेस्तराँमध्ये शेफ आणि वेटर म्हणून काम पाहत असे. बँकॉक आणि सिंगापूरहून खरेदी केलेल्या कपड्यांची विक्री तो भारतात करत असे. तसेच त्याने त्याच्या मित्राला जमीन खरेदी, विक्री यांच्यामध्येही मदत केली. एवढं सगळं केल्यानंतर आज तो बॉलिवूडचा सुपरस्टार आहे. 

*जॉनी लिव्हर :
हिंदी चित्रपटसृष्टीतील विनोदी कलाकारांपैकी एक नाव म्हणजे जॉनी लिव्हर. त्यांनी बॉलिवूडच्या ३०० पेक्षा जास्त चित्रपटांमध्ये भूमिका साकारल्या आहेत. त्यांचे खरे नाव जॉन राव असे असून त्यांचे शिक्षण केवळ सातवीपर्यंत झाले, आर्थिक परिस्थितीमुळे ते पुढे शिकू शकले नाहीत. शाळा सोडून त्यांनी मग मुंबईच्या रस्त्यांवर पेन विक्रीला सुरूवात केली. छोटया मोठया विनोदी कार्यक्रमांमुळे ते पुढे सरकत गेले आणि त्यांना दर्द का रिश्ता या चित्रपटाची आॅफर आली त्यानंतर त्यांनी मागे वळून पाहिले नाही.

* मिथून चक्रवर्ती :
 बॉलिवूड इंडस्ट्रीतील एक मोठ्ठं नाव म्हणजे मिथून चक्रवर्ती. अभिनय क्षेत्रात येण्यापूर्वी ते अत्यंत वेगळया वातावरणातून आलेले होते. त्यांच्या भावाचा अपघात झाला आणि त्यांचे कुटुंबीय हे दु:खाच्या दरीत लोटले गेले. त्यानंतर त्यांनी ते क्षेत्र सोडून शहरात येऊन काम शोधण्यास सुरूवात केली. लहान-मोठया कामांनंतर त्यांना प्रसिद्धी मिळाली. आणि मग ती वाट त्यांनी कधीच सोडली नाही.

* नवाजुद्दीन सिद्दीकी :
बॉलिवूडमध्ये सर्वांत जास्त चर्चेत असलेलं नाव म्हणून नवाजकडे आपण पाहतो. अभिनयक्षेत्रात येण्यापूर्वी तो दिल्लीत वॉचमन म्हणून काम करत होता. तसेच बडोदा येथे त्याने चीफ केमिस्ट म्हणून देखील काम पाहिले. ‘सरफरोश’ चित्रपटातून त्याने डेब्यू केला होता. मात्र, मोठा ब्रेक मिळण्यासाठी त्याला तब्बल १० वर्ष थांबावं लागलं.

Web Title: Bollywood's 'The Artists' Life Inspirational!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.