बॉलिवूडचे ‘बेफिक्रे’!
By ऑनलाइन लोकमत | Published: November 28, 2016 05:41 PM2016-11-28T17:41:03+5:302016-11-28T17:41:03+5:30
आदित्य चोप्रा दिग्दर्शित ‘ बेफिक्रे’ हा सिनेमा लवकरच प्रदर्शित होतोय. चित्रपटाच्या नावाप्रमाणेच बॉलिवूडचा खºया अर्थात ‘बेफिक्रा’ अभिनेता रणवीर सिंह यात ...
आ ित्य चोप्रा दिग्दर्शित ‘ बेफिक्रे’ हा सिनेमा लवकरच प्रदर्शित होतोय. चित्रपटाच्या नावाप्रमाणेच बॉलिवूडचा खºया अर्थात ‘बेफिक्रा’ अभिनेता रणवीर सिंह यात मुख्य भूमिकेत आहे. या चित्रपटात ‘उडे दिल बेफिक्रे...’ म्हणणारा रणवीर त्याच्या रिअल लाईफमध्येही असाच ‘बेफिके्र’जगतो. त्याच्याचप्रमाणे ‘बेफिक्रे’ जगणारे अनेक जण बॉलिवूडमध्ये आहेत. अशाच काही बॉलिवूडच्या ‘ बेफिक्रे’ स्टार्सविषयी...
रणवीर सिंह
रणवीर सिंह हा बॉलिवूडचा सगळ्यात ‘बेफिक्रा’ स्टार. स्टाईल स्टेटमेंंट असो, पर्सनल लाईफ असो वा स्टेट अपिअरन्स प्रत्येक ठिकाणी रणवीर अगदी ‘बेफिक्रे’ स्टाईल’ने वावरतो. बॉलिवूडचे अनेक सेलिब्रिटी पर्सनल लाईफ लपवतांना दिसतात. पण रणवीरने कधीही असा प्रयत्न केला नाही. म्हणूनच दीपिका पादुकोण हिच्यावरील प्रेमाची जाहिर कबुली देताना तो जराही दचकला नाही. त्याची चित्रविचित्र फॅशन अनेकदा टीकेचा विषय ठरली पण म्हणून रणवीर बदलला नाही. कंडोमची जाहिरात असो वा वादग्रस्त विधाने रणवीर कधीच हातचे राखून वागला, बोलला नाही.
सलमान खान
सलमान खानही रणवीर सारखाच एक ‘बेफिक्रा’ स्टार. सलमानची पर्सनल लाईफ प्रचंड वादळी राहिली. कोर्ट कचेºयांपासून तर तुरुंगात जाण्यापर्यंत आणि प्रेमप्रकरणांपासून तर ‘बीर्इंग ह्युमन’पर्यंत,सलमानचे आयुष्य म्हणजे एक जिवंतपट आहे. सलमानच्या आयुष्यात अनेक प्रेमिका आल्या आणि गेल्यात. फटकळ बोलण्याने त्याने अनेक वाद ओढवून घेतले. प्रसंगी तुरुंगात गेला. पण सलमानने ‘बेफिक्रे’ वागणे सोडले नाही. बॉलिवूडचा ‘दबंग खान’ त्याला उगाच म्हणत नाहीत.
करिना कपूर
कपूर घराण्याचा वारसा घेऊन करिना कपूर बॉलिवूडमध्ये आली खरी. पण बॉलिवूडमध्ये तिने स्वत:चे स्थान निर्माण केले ते तिच्या स्वत:च्या अटींवर. शाहीद कपूर आणि मग सैफ अली खान तिच्या आयुष्यात आला. पण या दोघांसोबतचे प्रेमसंबंध लपवण्याचा खटाटोप करताना करिना कधीच दिसली नाही. करिनाला जे चित्रपट आवडले तेच तिने केले. तिने नाकारलेले अनेक चित्रपट हिट झालेत. पण करिनाने त्याबद्दल कधीही पश्चाताप केला नाही. कपूर ते बेगम खानपर्यंतचा प्रवास असो वा बेबी बम्पसह सार्वजनिक ठिकाणी मिरवणे असो करिना नेहमीच ‘बेफिक्रे’ अंदाजात वावरली, वावरतेयं.
कंगना राणौत
कंगना राणौत हिने स्वत:च्या हिमतीवर बॉलिवूडमध्ये स्वत:चे साम्राज्य निर्माण केले. खºयाअर्थाने ‘बेफिक्रे’ होत ती आयुष्यातील प्रत्येक आव्हानांना सामोरी गेली. सुरुवातीच्या काळात बॉलिवूडच्या अनेकांनी कंगनाची हेटाळणी केली. पण कंगनाने हार न मानता ‘बॉलिवूडची क्विन’चा ताज आपल्या नावावर केला. सूरज पांचोलीसोबतचे तिचे नाते एका मोठ्या वादाने संपले. यानंतर शेखर सुमनचा मुलगा अध्ययन याच्यासोबतचा तिचा लव्ह एपिसोडही तितकाच वादळी राहिला. यानंतर अगदी अलीकडे हृतिक रोशनसोबतचे तिचे ‘लव्ह अॅण्ड हेट’ प्रकरणही तितकेच गाजले. पण कंगना या सगळ्यांना पुरून उरली आणि ‘बेफिक्रे’ स्टाईलने प्रत्येक आव्हानाला सामोरे गेली.
राधिका आपटे
राधिका आपटे नावाच्या मराठमोळ्या मुलीने बॉलिवूडमध्ये एक स्वत:चे वेगळे स्थान निर्माण केलेय. पण हे स्थान निर्माण करताना राधिकाने कधीही टीकेची पर्वा केली नाही. चित्रपटातील बोल्ड आणि इंटीमेट सीन्सवरून तिच्यावर अनेकदा टीका झाली. पण हा माझ्या कामाचा भाग आहे. माझे नग्न शरिर पाहण्याची इच्छा असणाºयांनी स्वत:ला नग्न करून आरशात बघावे, असे ती बेधडक सांगते. हिचा हाच बेधडक स्वभाव तिला ‘बेफिक्रे’ बनवतो.