बॉलिवूडमधील बिनधास्त खलनायक

By ऑनलाइन लोकमत | Published: November 20, 2016 08:48 PM2016-11-20T20:48:49+5:302016-11-20T20:48:49+5:30

बॉलीवूडमध्ये खलनायकांचा एक जमाना होता. आता ‘बेफिक्रे’ पद्धतीने खलनायक वावरताना दिसतात. खलनायक म्हटले की पूर्वी विशिष्ट लोकांची नावे लक्षात ...

Bollywood's blockbuster villains | बॉलिवूडमधील बिनधास्त खलनायक

बॉलिवूडमधील बिनधास्त खलनायक

googlenewsNext
लीवूडमध्ये खलनायकांचा एक जमाना होता. आता ‘बेफिक्रे’ पद्धतीने खलनायक वावरताना दिसतात. खलनायक म्हटले की पूर्वी विशिष्ट लोकांची नावे लक्षात राहायची. आपल्याला प्राण, अमजद खान, अजित, प्रेम चोप्रा, अमरीश पुरी ही नावे माहिती आहेत. अलीकडच्या काळात हिरोही खलनायक झाले आहेत. त्यांची चित्रपटात वावरण्याची पद्धत, त्यांची स्टाईल ही पूर्वीपेक्षा वेगळी आहे.  अशाच काही खलनायकांची माहिती या ठिकाणी देत आहोत.
करण जोहर



बॉम्बे वेल्वेट हा चित्रपट वेगळ्या अर्थाने गाजला, तो म्हणजे निर्माता, दिग्दर्शक करण जोहरच्या खलनायकाच्या भूमिकेने. अनुराग कश्यपच्या दिग्दर्शनाखाली तयार झालेल्या या चित्रपटात कैजाद खंबाटाच्या भूमिकेने करणला वेगळी ओळख मिळाली असली तरी हा चित्रपट जोरदार आपटला.
नवाजुद्दीन सिद्दीकी



तुम्हाला सलमान खानचा ‘किक’ हा चित्रपट आठवत असेल तर त्या चित्रपटात नवाजची हसण्याची पद्धत खूपच वेगळी होती. नवाजुद्दीन हा खूपच व्हर्साटाईल अ‍ॅक्टर आहे. त्याने अनेक चित्रपटांतून आपल्या अभिनयाचा ठसा उमटविला आहे. बदलापूर चित्रपटातील त्याचा सायको क्रिमिनल सर्वांच्याच लक्षात राहण्याजोगा आहे.
विद्युत जमावल



फोर्स चित्रपटात जॉन अब्राहमच्या विरुद्ध भूमिका करणाºया विद्युत जमावलने नंतर कमांडो चित्रपटातही भूमिका केली होती. मार्शल आर्टमध्ये पारंगत असल्याने त्याला अशा भूमिका निभावताना फारसा त्रास होत नाही.
करणसिंग ग्रोव्हर



हेट स्टोरी ३ या चित्रपटातून बिपाशा बासूचा पती करणसिंग ग्रोव्हरने पदार्पण केले. शर्मन जोशी आणि जरीन खान यांचे आयुष्य उद्ध्वस्त करणाºया खलनायकाची भूमिका करणने साकारली होती.
दर्शन कुमार



अनुष्का शर्माचा एन. एच. १० हा चित्रपट खूप गाजला. या चित्रपटातील दर्शन कुमारची भूमिका खूपच हटके होती. आपल्या सुरक्षेबाबत लोकांना विचार करायला लावणारा हा चित्रपट आहे.
नीरज काबी



तुम्हाला डिटेक्टिव्ह व्योमकेश बक्षी हा चित्रपट आठवतोय का? या चित्रपटात नीरज काबीने तितक्याच तोडीची भूमिका केली आहे. यापूर्वीच्या चित्रपटातूनही नीरज काबी याने आपल्या भूमिकेचा डंका गाजविला होता.
नील नितीन मुकेश



प्रेम रतन धन पायो हा चित्रपट सलमान खानचा म्हणून ओळखला जात असला तरी या चित्रपटात नील नितीन मुकेश याची नकारात्मक भूमिकाही तितकीच गाजली. तसा नील हा दाक्षिणात्य चित्रपटात खूप गाजतो आहे.





 

Web Title: Bollywood's blockbuster villains

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.