बॉलिवूडची 'चांदनी' श्रीदेवी आणि पती बोनी यांच्या प्रेमाचे रंग,२०१३ साली खेळल्या होत्या होळी..

By ऑनलाइन लोकमत | Published: March 2, 2018 10:34 AM2018-03-02T10:34:25+5:302018-03-02T16:04:25+5:30

बॉलिवूडची चांदनी श्रीदेवी पंचत्वात विलीन होऊन अवघे दोन दिवस झालेत. मात्र रसिकांच्या मनातून चांदनीच्या आठवणी काही केल्या जात नाहीत. ...

Bollywood's 'Chandni', the color of love of husband and goddess, was played in 2013, Holi .. | बॉलिवूडची 'चांदनी' श्रीदेवी आणि पती बोनी यांच्या प्रेमाचे रंग,२०१३ साली खेळल्या होत्या होळी..

बॉलिवूडची 'चांदनी' श्रीदेवी आणि पती बोनी यांच्या प्रेमाचे रंग,२०१३ साली खेळल्या होत्या होळी..

googlenewsNext
लिवूडची चांदनी श्रीदेवी पंचत्वात विलीन होऊन अवघे दोन दिवस झालेत. मात्र रसिकांच्या मनातून चांदनीच्या आठवणी काही केल्या जात नाहीत. श्रीदेवी यांच्या निधनामुळे बॉलिवूडची दरवर्षी साजरी होणारी होळीसुद्धा रद्द करण्यात आली.अनेक कलाकारांनी आजचे होळी सेलिब्रेशन रद्द केले आहे.श्रीदेवीही अनेकदा रंगात रंगून गेल्या होत्या.श्रीदेवी आणि पती बोनी कपूर यांच्यातील प्रेमाचे नातं अनेकदा पाहायला मिळाले.मात्र होळीच्या रंगातही या दोघांचं प्रेमाचं घट्ट नातं दिसून आलं.दोघांच्या नात्यातील प्रेमाचे बंध २०१३ सालच्या होळी सेलिब्रेशनमध्ये दिसून आले.श्रीदेवी लखनऊला आल्या होत्या.
येथे त्यांनी सहारा सिटीमध्ये सिंदूर होळी खेळली होती.साड्यांची आवड असलेल्या श्रीदेवी यांनी सिंदूर होळीवेळीही साडी नेसलेली होती आणि पाठीवर पती बोनी यांचे नाव लाल रंगाने लिहिले होते.यावरुन दिसून येते की श्रीदेवी यांचे पती बोनीवरील प्रेमाची अनुभूती येते. 








बॉलिवूडची ‘चांदनी’ श्रीदेवी स्वत: अनंताच्या प्रवासाला निघून गेली आणि जाताना मागे अनेकांना एकटी सोडून गेली. विशेषत: पती बोनी कपूर आणि दोन्ही मुली खुशी कपूर व जान्हवी कपूर हे श्रीदेवींच्या जाण्याने तुटून पडले आहेत.श्रीदेवी अनंतात विलीन झाल्यानंतर मात्र त्यांनी आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली.श्रीदेवींच्याच टिष्ट्वटर हँडलवरून त्यांनी आपल्या भावना व्यक्त करणारी एक लांबलचक पोस्ट लिहिली आहे. ही पोस्ट वाचून संवेदनशील डोळ्यांच्या कडा ओलावल्याशिवाय राहणार नाहीत.एक मित्र, पत्नी आणि दोन तरूण मुलींची आई गमावल्याचे दु:ख शब्दांत व्यक्त करता येण्यासारखे नाही, अशी सुरुवात बोनींनी केली आहे. या दु:खद घडीला सोबत करणारे मित्र, नातेवाईक, शुभचिंतक आणि चाहत्यांचे त्यांनी आभार मानले आहेत. विशेषत: अर्जुन कपूर आणि अंशुला कपूर या दोघांनी सगळे काही विसरून दाखवलेला मनाचा मोठेपणा पाहून भारावलेल्या बोनींनी त्यांचा खास उल्लेख केला आहे. अर्जुन व अंशुला हे दोघेही माझी ताकद बनून माझ्यासोबत राहिले. जान्हवी आणि खुशीला त्यांनी धीराने सांभाळले, असे बोनींनी लिहिले आहे. आमचे अख्खे कुटुंब तिच्या भोवती फिरायचे. याक्षणाला मी माझी पत्नी आणि जान्हवी व खुशीच्या आईला निरोप देत आहोत. या क्षणी दु:ख सहन करण्यासाठी आम्हाला हव्या असणाºया खासगी क्षणांचा सन्मान व्हावा, हीच माझी विनंती आहे.तुम्हाला श्रीबद्दल बोलायचे तर तिच्या आठवणींबद्दल बोला.कुठल्याही कलाकाराच्या आयुष्यावर कधीच पडदा पडू शकत नाही.तो नेहमीच चंदेरी पडद्यावर चमकत राहतो. सध्या मी माझ्या दोन्ही मुलींप्रति आणि श्रीशिवाय पुढे जाण्याच्या कल्पनेने चिंतीत आहे. ती आमचे आयुष्य होती. आमची हिंमत होती आणि आमच्या हसण्याचे कारण होती. आम्ही तिच्यावर प्रचंड प्रेम करायचो, करत राहू.रेस्ट इन पीस, माय लव्ह... आमचे आयुष्य पुन्हा आधीसारखे कधीच होणारे नाही...! बोनी कपूर यांनी लिहिलेली ही पोस्ट अनेकांना भावूक करुन गेली.

Web Title: Bollywood's 'Chandni', the color of love of husband and goddess, was played in 2013, Holi ..

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.