युजर्सवर भडकला बॉलिवूडचा ‘हा’ दिग्दर्शक; सुनावले खडेबोल!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 18, 2019 06:57 PM2019-08-18T18:57:25+5:302019-08-18T18:58:22+5:30
सोशल मीडियावर युजर्सनी म्हणे त्याला ‘गे’ म्हणून संबोधले. हे पाहताच साहजिक करण जोहर भडकला आणि त्याने युजर्सला चांगलेच फैलावर घेतल्याचे दिसून आले. त्यांना खडेबोल सुनावून सणसणीत उत्तर दिल्याचे समजतेय.
करण जोहर याला बॉलिवूडच्या प्रसिद्ध दिग्दर्शकांपैकी एक गणले जाते. ‘कलंक’,‘स्टुडंट ऑफ द इयर २’ या चित्रपटांना मिळालेले अपयश अद्याप पचवू शकलेला नाही. अशातच त्याने परदेशात तिरंगा फडकवला आणि त्याचे फोटोज सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले होते. आज मात्र आम्ही त्याच्याबद्दल एक वेगळीच बातमी घेऊन आलो आहोत. सोशल मीडियावर युजर्सनी म्हणे त्याला ‘गे’ म्हणून संबोधले. हे पाहताच साहजिक करण जोहर भडकला आणि त्याने युजर्सला चांगलेच फैलावर घेतल्याचे दिसून आले. त्यांना खडेबोल सुनावून सणसणीत उत्तर दिल्याचे समजतेय.
You absolutely orignal genius! Where have you been hiding all this while??? Thank you for existing and emerging as the most prolific voice on Twitter today!!! https://t.co/5lxcPMjVif
— Karan Johar (@karanjohar) August 18, 2019
करण जोहरला दररोज विविध गोष्टींना सामोरे जावे लागते. मात्र, आता सोशल मीडियावर युजर्सनी एका पोस्टमध्ये ‘गे’ असे संबोधले. आत्तापर्यंत अनेकदा त्याला गे असे संबोधले गेले असता त्याने नेटकऱ्यांना खडे बोल सुनावल्याचे दिसून आले आहे. यावेळेस मात्र, त्याने युजर्सना चांगलेच खरमरीत उत्तर दिले आहे. युजरने टिष्ट्वट केले की,‘करण जोहरच्या आयुष्यावर एक चित्रपट बनवायला हवा. ‘करण जोहर: द गे’ असे म्हणताच करण जोहर भडकला. करणने उत्तर दिले,‘ तू खरंच एक जिनीयस आहेस. तू आत्तापर्यंत हे कुठे लपवून ठेवले होते. खरंच खूप धन्यवाद. तू या विषयावर बोललास ते. करणने असे टिवट करताच अनेक चाहत्यांनी त्याला पाठिंबाही दिला. म्हणे, ‘करण, तू अशा लोकांकडे लक्ष दे आणि त्यांना वेळीच उत्तर दे.’
अलीकडेच एका शोवर त्याला विचारण्यात आले की, तू युजर्सला कशाप्रकारे सांभाळतोस? त्यावर त्याने म्हटले होते की, मला कधीकधी नेटकऱ्यांचा खूप राग येतो. मी सकाळी उठतो तेव्हा लोक मला शिव्या देत आहेत हे मी पाहतो. पण यामुळे मी स्वत: वाईट वाटून घेत नाही. याउलट मी माझ्या व्यंगावर कोणी मला बोललं की, मी जास्त त्रासतो.’