व्हायरल होताच उघडले बॉलिवूडचे दरवाजे

By ऑनलाइन लोकमत | Published: June 5, 2018 01:22 PM2018-06-05T13:22:19+5:302018-06-05T18:52:19+5:30

बॉलिवूडमध्ये एंट्री मिळविण्यासाठी किती कष्ट घ्यावे लागतात हे एखादा स्ट्रगरलच चांगल्या पद्धतीने सांगू शकेल. सलमान-शाहरूखसह ज्या कलाकारांना आज इंडस्ट्रीत ...

Bollywood's door opened as a viral | व्हायरल होताच उघडले बॉलिवूडचे दरवाजे

व्हायरल होताच उघडले बॉलिवूडचे दरवाजे

googlenewsNext
ong>बॉलिवूडमध्ये एंट्री मिळविण्यासाठी किती कष्ट घ्यावे लागतात हे एखादा स्ट्रगरलच चांगल्या पद्धतीने सांगू शकेल. सलमान-शाहरूखसह ज्या कलाकारांना आज इंडस्ट्रीत लोकप्रियता मिळाली त्यासाठी त्यांना वर्षानुवर्ष मेहनत घ्यावी लागली. मात्र हल्ली सोशल मीडियाच्या युगात लोकप्रियता मिळविणे फार सोपे झाले आहे. व्हिडीओ किंवा फोटो शेअर करा अन् रातोरात स्टारडम मिळवा असेच काहीसे चित्र सोशल मीडियावर बघावयास मिळत आहे. यातील काही मंडळी तर अशी काही व्हायरल झाली की, त्यांना चक्क बॉलिवूडचे दरवाजे उघडले गेले आहेत. त्याचाच आढावा घेणारा हा वृत्तांत...



डान्सिंग अंकल
लग्नात डान्स काय केला अन् रातोरात स्टारडमचा टॅग आपल्या नावासमोर लावला. होय, डान्सिंग अंकल या नावाने भारतातच नव्हे तर विदेशात वाºयासारखे व्हायरल होत असलेल्या प्रा. संजीव श्रीवास्तव यांना सध्या जणूकाही लॉटरीच लागली आहे. कारण केवळ सामान्यच नव्हे तर मोठमोठे सुपरस्टार्सही त्यांच्या डान्सच्या प्रेमात पडताना दिसत आहे. रविना टंडन, अर्जुन कपूर, गोविंदा यांच्यासह अनेक सेलिब्रिटी आज डान्सिंग अंकल ऊर्फ डब्बू अंकलचे तोंडभरून कौतुक करीत आहेत. अभिनेता सुनील शेट्टीने तर त्यांना चक्क मुंबईत येण्याचे आमंत्रण दिले आहे. तर इंडस्ट्रीतील बरेचसे दिग्दर्शक आणि निर्माते त्यांना भेटण्यास उत्सुक आहेत. 



ढिचॅँक पूजा
ढिचॅँक पूजा अर्थात पूजा जैन हिच्या लोकप्रियतेबद्दल सांगताना शब्द अपुरे पडतील. ना ताल ना सूर अशा अंदाजात गाणं गाऊनही एखादा लोकप्रिय होऊ शकतो हे पूजाने दाखवून दिले. विचित्र शैलीने गायिलेले गाणे यू-ट्यूबवर अपलोड करून ती अशी काही लोकप्रिय झाली की, बॉलिवूडकरही तिच्या प्रेमात पडले. पूजाची लोकप्रियता एवढ्यावरच थांबली नाही तर तिला सलमान खान होस्ट असलेल्या ‘बिग बॉस’ या रिअ‍ॅलिटी शोमध्येही एंट्री मिळाली. पूजाचे गाणे लोकांना युनिक वाटत असून, त्यातून ती लाखो रुपयेही कमावत आहे. 



प्रिया प्रकाश वारियर
‘व्हायरल गर्ल’ किंवा ‘इंटरनेट सनसनी’ हे शब्द जरी कानावर पडले तरी, ते प्रिया प्रकाश वारियरशीच संबंधित असावेत, असा समज चाहत्यांचा होतो. केवळ २८ सेकंदाच्या व्हिडीओमध्ये नैन मटक्का करून प्रिया रातोरात स्टार झाली. ‘ओरू अदार लव’ या तिच्या मल्याळम चित्रपटातील ‘मानिका मल्यारा पूवी’ या गाण्यात तिने डोळ्यांच्या अदा दाखवत तमाम तरुणांना घायाळ केले. आज प्रियाची लोकप्रियता इतकी आहे की, ती सोशल मीडियावर एक व्यावसायिक पोस्ट शेअर करण्यासाठी आठ लाख रुपये चार्ज करते. 



सायमा हुसेन मीर
काही काळापूर्वी बॉलिवूडचा किंग शाहरूख खानने पुण्याच्या एका फॅशन इन्स्टिट्यूटमध्ये त्याच्या चाहत्यांसोबत एक सेल्फी क्लिक केली होती. मात्र या सेल्फीमुळे शाहरूखला लोकप्रियता मिळाली नाही, तर त्याच्या मागे फोटोमध्ये दिसत असलेल्या सायमा हुसेन मीर या तरुणीला मिळाली. सायमाचा हा फोटो असा काही व्हायरल झाला की, ती रातोरात प्रसिद्धीझोतात आली. प्रत्येकजण तिच्याबद्दल जाणून घेण्यास उत्सुक होता. 

Web Title: Bollywood's door opened as a viral

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.