फक्त ४ मिनिटांचा होता बॉलिवूडमधील फर्स्ट किस सीन, वाचा सविस्तर
By ऑनलाइन लोकमत | Published: November 17, 2019 09:00 PM2019-11-17T21:00:00+5:302019-11-17T21:00:00+5:30
८४ वर्षांपूर्वी बॉलिवूडच्या चित्रपटात किसिंग सीन चित्रीत करण्यात आला होता.
बॉलिवूड चित्रपटांमध्ये रोमांस नसेल तर चित्रपट अपूर्ण वाटतो. हल्लीच्या चित्रपटात खूप बोल्ड सीन असतो. मात्र तुम्हाला माहित आहे का, बॉलिवूडमध्ये पहिला किसिंग सीन पहिल्यांदा कधी चित्रीत झाला होता. ८४ वर्षांपूर्वी बॉलिवूडमध्ये चित्रपट कर्मामध्ये किसिंग सीन चित्रीत करण्यात आला होता.
आता किसिंग सीन म्हटलं की डोळ्यासमोर येतो तो बॉलिवूड अभिनेता इमरान हाश्मी. मात्र किसिंग सीनची सुरूवात अभिनेत्री देविका राणीने केली होती.
१९३३ साली प्रदर्शित झालेला चित्रपट कर्मामध्ये अभिनेत्री देविका राणी व हिमांशु राय यांनी पहिला किसिंग सीन दिला होता. चार मिनिटांचा हा किसिंग सीन होता. पण, हा कोणत्या लव सीनचा भाग नव्हता. तर या सीनमध्ये अभिनेता बेशुद्ध होतो आणि त्याला शुद्धीत आणण्यासाठी ती त्याला किस करते.
हिमांशू राय आणि देविका राणी हे खऱ्या आयुष्यात पती पत्नी होते. परंतु त्यावेळी रुपेरी पडद्यावर बोल्ड सीन चित्रीत करणं सोप्पे नव्हते.
या चित्रपटातील एक किसिंग सीन हा चार मिनिटांचा होता. त्यानंतर देविका यांनी ३५ वेळा किसिंग सीन दिले. हे सीन त्याकाळी सर्वात बोल्ड सीन म्हणून ओळखले गेले होते. विशेष म्हणजे देविका राणी आणि हिमांशू रॉय यांच्या या सीनची रसिकांमध्ये प्रचंड चर्चा रंगली होती. या सीनमुळे देविका राणी हिंदी चित्रपटसृष्टीत किसिंग सीन देणाऱ्या त्या पहिल्या अभिनेत्री ठरल्या. त्यांच्या या सीननंतर चित्रपटांमध्ये किसिंग सीन देण्यास अभिनेत्री सहज तयार होऊ लागल्या.