हॉलिवूडसोबत बॉलिवूडची हातमिळवणी; ‘इरॉस इंटरनॅशनल’ने बनवली नवी कंपनी!!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 19, 2020 06:11 PM2020-04-19T18:11:51+5:302020-04-19T21:40:24+5:30
आता कोरोनाच्या या संकटकाळात हॉलिवूडसोबत बॉलिवूडने हातमिळवणी केल्याचे समजतेय. इरॉस इंटरनॅशनलने एका हॉलिवूड कंपनीसोबत न्यूयॉर्क स्टॉक एक्सचेंजमध्ये एक नवी कंपनी स्थापन केली आहे.
११ वर्षांपूर्वी ‘इरॉस इंटरनॅशनल मीडिया लिमिटेड’ कंपनी लाँच केली होती. या कंपनी हाऊसमधून अनेक हिट चित्रपट बनवले गेले. बदलापूर, बाजीराव मस्तानी, बजरंगी भाईजान या सारखे हिट चित्रपट प्रेक्षकांसाठी पर्वणीचे ठरले. आता मात्र एक वेगळीच बातमी सुत्रांकडून कळतेय. ती म्हणजे, आता कोरोनाच्या या संकटकाळात हॉलिवूडसोबतबॉलिवूडने हातमिळवणी केल्याचे समजतेय. इरॉस इंटरनॅशनलने एका हॉलिवूड कंपनीसोबत न्यूयॉर्क स्टॉक एक्सचेंजमध्ये एक नवी कंपनी स्थापन केली आहे. या नव्या कंपनीचे नाव ‘इरॉस एसटीएक्स ग्लोबल कॉर्पोरेशन’ असणार आहे.
एसटीएक्स एंटरटेनमेंट कंपनी ही हॉलिवूडची मोठी कंपनी समजली जाते. या कंपनीने ‘हसलर्स’ आणि ‘बॅड मॉम’ अशी सुपरहिट चित्रपटांची निर्मिती करण्यात आलेली आहे. या दोन्ही कंपनीना मिळून जी एक नवी कंपनी तयार झालीय ती आता चीनच्या मोठया बाजारावर नियंत्रण ठेवणार असल्याचे समजतेय. नॅशनल स्टॉक एक्सचेंजमध्ये शुक्रवारी इरोसचे शेअर्स १४ ते ९० रुपयांवर बंद झाले. अवघ्या पाच वर्षांत कंपनीची शेअर किंमत ६२९ रुपयांवरून ७५ पैसे इतक्या सर्वोच्च पातळीवर आली आहे. सोमवारी भारतीय शेअर बाजार सुरू होईल तेव्हा या नव्या घोषणेचा परिणाम कळेल. वॉल स्ट्रीटमधील या घोषणेच्या प्रभावामुळे असे दिसून आले की, शुक्रवारी इरॉस इंटरनेशनलची किंमत १.०९ डॉलरवरून ३.०५ डॉलरपर्यंत वाढली तर गेल्या एका वर्षात या शेअर्सच्या किंमती तिथे ६० टक्क्यांहून अधिक खाली आल्या आहेत.
‘इरॉस’ कंपनीचे नाव मुंबई इंडस्ट्रीत मोठया विश्वासार्हतेने घेतले जाते. कंपनीच्या यशस्वीतेसाठी चित्रपटांसोबतच ओटीटीचीही मोठी मदत होते. मागील एक वर्षांपासून या कंपनीसोबत काम करणाऱ्या व्यक्तींच्या बऱ्याच समस्या असल्याच्या जाणवते. कंपनीचे सध्याचे सीईओ किशोर लुला यांना आता त्यांचा पदभार सोडावा लागणार आहे. एसटीएक्सचे सहसंस्थापक रॉबर्ट सिमंड्स हे आता नव्या कंपनीचे सीईओ होतील. सुत्रांनुसार मिळालेल्या माहितीनुसार, इरॉस नाऊ ओटीटीचे १८ कोटी ८० लाख हे नोंदणीकृत ग्राहक आहेत. जवळपास २ कोटी ६० लाख नियमित ग्राहक आहेत.